Bangladesh Hindu killing
esakal
बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी रात्री नरसिंदी जिल्ह्यात २३ वर्षीय हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. चंचल भौमिक असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्याच दुकानात जिवंत जाळून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.