Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Bangladesh Violence : डिसेंबर महिन्यामध्येच हिंसाचाराच्या किमान ५१ घटना घडल्या आहेत; अल्पसंख्याक मंचाने व्यक्त केली चिंता
Rising Religious Violence Against Hindus in Bangladesh

Rising Religious Violence Against Hindus in Bangladesh

esakal

Updated on

Rising Religious Violence Against Hindus in Bangladesh : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. यामध्ये आज आणखी एक हत्येची भर पडली, नौगावमध्ये मिथुन सरकार या हिंदू तरुणाची त्याला बुडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मागील २० दिवसांती ही सातवी हत्या ठरली आहे.

हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश अल्पसंख्याक मंचाने म्हटले आहे की, अल्पसंख्यांकाविरोधातील हिंसाचार चिंताजनक दराने वाढत आहे. यामुळे भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न असा आहे की सरकार, प्रशासन नेमके काय करत आहे? मानवाधिकार संघटना कुठे आहेत?

तसेच अल्पसंख्याक मंचाने सांगितले आहे की सत्य रंजन दास यांची २ जानेवारी रोजी, खोकण चंद्र दास यांची ३ जानेवारी रोजी, शुभो पोद्दार यांची ४ जानेवारी रोजी आणि राणा प्रताप बैरागी यांची ५ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली. संसदीय निवडणुका जवळ येत असताना, जातीय हिंसाचार चिंताजनक दराने वाढत आहे. डिसेंबरमध्येच हिंसाचाराच्या किमान ५१ घटना घडल्या.

Rising Religious Violence Against Hindus in Bangladesh
8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

एकट्या डिसेंबरमध्येच हिंसाचाराच्या किमान ५१ घटना घडल्या आहेत. अल्पसंख्याक मंचाने म्हटले आहे की यामध्ये खून, चोरी आणि दरोड्याच्या घटना, घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने, मंदिरे आणि जमिनीशी संबंधित अतिक्रमण, लूटमार आणि जाळपोळीच्या घटना, धार्मिक निंदा आणि रॉ एजंट असल्याच्या खोट्या आरोपाखाली ताब्यात ठेवणे व छळ करण्याची प्रकरणं, बलात्कार आणि हल्ल्यांंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com