Bangladesh Violence: बांगलादेशातील आंदोलकांनी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल पेटवलं, 24 जणांचा मृत्यू; भीषण व्हिडिओ आला समोर

या १४ मजली हॉटेलला पहिल्या मजल्यापासून टॉपच्या मजल्यापर्यंत आग लावण्यात आली आहे.
Bangladesh Violence: बांगलादेशातील आंदोलकांनी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल पेटवलं, 24 जणांचा मृत्यू; भीषण व्हिडिओ आला समोर
Updated on

ढाका : बांगलादेशात सध्या मोठं राजकीय आरिष्ठ आलं असून आंदोलकांनी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल झबीर पेटवून दिलं आहे. या १४ मजली हॉटेलला पहिल्या मजल्यापासून टॉपच्या मजल्यापर्यंत आग लावण्यात आली आहे. याचा भयानक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

Bangladesh Violence: बांगलादेशातील आंदोलकांनी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल पेटवलं, 24 जणांचा मृत्यू; भीषण व्हिडिओ आला समोर
Bangladesh Violence: बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिली माहिती

झबीर इंटरनॅशनल हॉटेल असं या हॉटेलं नाव असून सध्याच्या आवामी लीग सरकारमधील खासदार शाहीन चकलदार यांच्या मालकीचं हे हॉटेल असून ते बांगलादेशातील नैऋत्य भागातील जोशोर जिल्ह्यात स्थित आहे. या भीषण घटनेमध्ये हॉटेलमधील २५ नागरिकांचा मृत्यू झाला असून १५० जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये एक इंडोनेशियाच्या नागरिकाचाही समावेश आहे.

Bangladesh Violence: बांगलादेशातील आंदोलकांनी प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल पेटवलं, 24 जणांचा मृत्यू; भीषण व्हिडिओ आला समोर
Pune Reverse Tempo: हडपसरमध्ये उड्डाणपुलावर थरार! पुणे महापालिकेचा टेम्पो ड्रायव्हरविना रिव्हर्सगियरमध्ये सुसाट

हॉटेल पेटवून दिल्यानंतर आक्रमक झालेले आंदोलक खासदार शाहीन चकलदार यांना शोधत होते, परंतू ते त्यांच्या हाती लागले नाहीत, त्यानंतर या आंदोलकांनी त्यांचं हॉटेलच पेटवून दिलं. झबीर हॉटेल हे बांगलादेशातील एक प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल आहे. बांगलादेशच्या माध्यमांतील वृत्तानुसार, हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरला आंदोलकांनी पेटवून दिल्यानंतर काही वेळातच ही आग वरच्या फ्लोअरपर्यंत पसरली.

दरम्यान, आंदोलकांनी देशभरात हिंसाचार सुरु केला असून आवामी लीग पक्षाच्या नेत्यांची घरं आणि व्यावसायिक मालमत्तांची तोडफोड केली आहे. यामध्ये पक्षाचं ढाक्यातील बंगबंधू अव्हेन्यू इथलं मध्यवर्ती कार्यालयही आंदोलकांनी फोडलं आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा देत देश सोडल्यानंतर तर या देशात मोठी अराजकतेची परस्थिती निर्माण झाली असून इथल्या संसदेत घुसून लोकांनी तोडफोड केल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. काही आंदोलकांनी तर तिथल्या संसदेतील अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून मोडतोड केल्याचं या व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com