Bangladesh News: विद्यार्थ्याच्या बंडातून लोकशाही स्थापनेत अपयश; बांगलादेशातील आंदोलनाची वर्षपूर्ती, नवीन पिढी निराशेच्या गर्तेत
Student Protests: बांगलादेशातील ५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या विद्यार्थ्यांच्या बंडामुळे राजकीय वाद सुरू झाला आणि त्यात २३ वर्षीय मेहरुन्निसा यांची गोळी मारून हत्या झाली. याप्रसंगी तारीफ आणि त्यांच्या बहिणीने सरकारविरोधात आंदोलनात सहभाग घेतला होता.
ढाका : पाच ऑगस्ट २०२४ च्या दिवशी ढाक्यातील अब्दुर रेहमान तारीफ हे बहिण मेहरुन्निसा यांच्याशी फोनवरून बोलत होते. त्याचवेळी अचानक समोरून येणारा आवाज बंद झाला. काहीतरी वाईट घडलंय, याची जाणीव झाली.