भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार?

banned china product is impossible in indian says china
banned china product is impossible in indian says china

बिजिंग : भारतात चायनाची जवळपास ७ हजार कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज आहे. भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवत आहे. पण, आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय असल्याचे चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे. मग, कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार असा सवालही ग्लोबल टाईम्सने उपस्थित केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून मध्यमवर्गीयांवर अधिक आर्थिक बोजा पडणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारतीयांकडील अधिक स्वस्त सामान हे चीनकडून येते. त्यामुळे बहिष्कार करण भारताला शक्य नसल्याचे चीनचे म्हणणे आहे.  भारतातील स्मार्टफोन मार्केटपैकी ७२ टक्के सहभाग हा चीनचा आहे. टीव्हीमध्ये हे प्रमाण ४५ टक्के तर रोजच्या सामानात ही भागीदारी ७० ते ८० टक्के इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या मध्ये कमांडर स्तरावर चर्चा झाली. ही चर्चा एलएसी परचशूलच्या समोर चीनकडील मोल्दोमध्ये झाली आहे. दोन्ही देशांनी पूर्व लद्दाख क्षेत्रात खासकरुन पैंगोंग त्सोच्या उत्तर भागातील वाद संपवण्यासाठी चर्चा केली. जेथे चीनी पीपुल्स लिबरेशन आर्मीने यथास्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हे क्षेत्र सध्या भारताच्या नियंत्रणात आहे. याआधी दोन्ही देशांच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. पण त्याचा कोणताच परिणाम निघाला नव्हता.

तत्पूर्वी, भारतात काही अतिराष्ट्रवादी चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवणं हे काही पहिल्यांदाच होतं नाही. पण, हे करणं तोट्याचं ठरु शकतं. सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ आणि रिमूव्ह चायना अॅप अॅप्लीकेशनवर देखील चीनने भाष्य केलं आहे. चीनच्या तक्रारीनंतर हे अॅप्लीकेशन प्ले स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. स्मार्टफोनमधून चायना अॅप डीलीट व्हावे या उद्देशाने हे बनविण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com