Viral News : अवघ्या पाच महिन्यांच्या पक्षाने न थांबता केला 13,560 किमीचा प्रवास; रचला नवा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bar-tailed Godwit Bird

Viral News : अवघ्या पाच महिन्यांच्या पक्षाने न थांबता केला 13,560 किमीचा प्रवास; रचला नवा विक्रम

Bar-tailed Godwit Bird World Record : आपण जगात अनेक व्यक्तींनी केलेल्या विश्वविक्रमाबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. मात्र, सध्या एका वेगळ्याच विश्वविक्रमाची चर्चा सर्वदूर सूरू आहे. चर्चा होणारा हा विक्रम कुणी व्यक्तीने केलेला नसून, एका पक्षाने केला आहे.

होय, Bar-tailed Godwit या पक्षाने हा विश्वविक्रम करत सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. विश्वविक्रम करणाऱ्या या पक्षाचे वय केवळ 5 महिने असून, त्याने ऑस्ट्रेलियातील अलास्का ते टास्मानिया असा 13,560 किमीचा प्रवास केला आहे, तोही न थांबता.

हजारो किमीचा प्रवास करण्यासाठी या पक्षाला 11 दिवस आणि 1 तास लागला. 13 ऑक्टोबर 2022 रोजी अलास्काहून प्रवास सुरू होण्यापूर्वी या पक्षाच्या पाठीवर एक सॅटेलाइट टॅग लावण्यात आला होता. त्यानंतर शास्त्रज्ञांनी या टॅगचा अभ्यास केला. त्यातून या पक्षाने कुठेही न थांबता हा विक्रम केल्याचे समोर आले. 'बर्ड ट्रॅकिंग प्रोजेक्ट' माक्स प्लांक इंस्टिट्यूटच्या पक्षीविज्ञान विभागाच्या वैज्ञानिकांद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला होता.

हजोरो किमीच्या प्रवासात या पक्षाला वाटेत ओशनिया, वानुआतु आणि न्यू कॅलेडोनिया सारखी बेटेदेखील लागली. मात्र, या ठिकाणी न थांबता तो अखंड उडत राहिला. त्यामुळे Bar-tailed Godwit या चिमुकल्या पक्षाने पहिल्या नर '4BBRW'चे दोन विक्रम मोडीत काढले आहेत. 2020 मध्ये या पक्षाने अलास्का ते न्यूझीलंड हे 12,854 किमी अंतर कापले होते. त्यानंतर 2021 मध्ये याच मार्गावर 13,050 किमी प्रवास करून त्याने स्वतःचा विक्रम मोडीत काढला होता.

टॅग्स :australiabirdJourney