अण्वस्त्रे निकामी करण्यास उत्तर कोरियात सुरवात 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची केंद्रे निकामी करण्यास उत्तर कोरियाकडून सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

उत्तर कोरियातील घडामोडींशी संबंधित अमेरिकेतील '38 नॉर्थ' या संकेतस्थळाकडून ही माहिती देण्यात आली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या इंजिनांची निर्मिती करण्याची सुविधा असलेले मुख्य केंद्र निकामी करण्यास सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रांतून दिसून येते, असे सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात मागील महिन्यात झालेल्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अण्वस्त्र निर्मिती केंद्रे नष्ट करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार उत्तर कोरियाकडून हळूहळू पावले उचलली जात आहेत, असे संकेतस्थळाने म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beginning of North Korea in destroying nuclear weapons