अवकाशयानाच्या फेरवापराचा प्रयोग यशस्वी

वृत्तसंस्था
Monday, 7 September 2020

अवकाश यान कशाप्रकारचे होते, असे विचारले असता चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. मात्र, अमेरिकेच्या एक्स-३७ बी या यानाप्रमाणेच ते असल्याचे सुचविण्यात आले.

बीजिंग - दोन दिवसांपूर्वी उड्डाण केलेले चीनचे फेरवापर करता येणारे प्रायोगिक अवकाशयान आज पृथ्वीवर परतले. हे यान यशस्वीपणे परतल्याने फेरवापरयुक्त अवकाश तंत्रज्ञानातील चीनमधील संशोधनाने मोठा टप्पा गाठला आहे, असे येथील माध्यमांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘लाँग मार्च - २ एफ’ या रॉकेटच्या साह्याने शुक्रवारी (ता. ४) या यानाने उड्डाण केले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पुढील अनेक उड्डाणांचा खर्च वाचण्याबरोबरच शांततापूर्ण मार्गाने अवकाशक्षेत्राचा वापर शक्य झाला आहे, असे चीनने म्हटले आहे. या मोहिमेबद्दल चीनने आधी फारशी वाच्यता केली नव्हती. आताही त्यांनी फार जुजबी माहिती जाहीर केली आहे. या उड्डाणासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धत वापरल्याचे त्यांनी सांगितले. हे अवकाश यान कशाप्रकारचे होते, असे विचारले असता चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. मात्र, अमेरिकेच्या एक्स-३७ बी या यानाप्रमाणेच ते असल्याचे सुचविण्यात आले. चीनने काही आठवड्यांपूर्वीच मंगळाच्या दिशेने यान सोडले असून त्याचे योग्य दिशेने मार्गक्रमण सुरु असल्याचे सांगण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beijing Experiment with spacecraft recycling successful

Tags
टॉपिकस
Topic Tags: