बेलारुस : राष्ट्रपतींकडून विमान हायजॅक; पत्रकाराला केली अटक

बेलारुस : राष्ट्रपतींकडून विमान हायजॅक; पत्रकाराला केली अटक
Summary

युनानहून लिथुआनियाला जाणाऱ्या रयान एअरचं (Ryan air) प्रवासी विमान जबरदस्तीने बेलारुसमध्ये उतरवण्यात आलं.

ब्रुसेल्स - बेलारुसमध्ये (Belarus) एक विमान अचानक उतरवल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. रविवारी युनानहून लिथुआनियाला जाणाऱ्या रयान एअरचं (Ryan air) प्रवासी विमान जबरदस्तीने बेलारुसमध्ये उतरवण्यात आलं. या विमानातून प्रवास करणारा पत्रकार रोमन प्रोत्सेविच (Roman Protasevich) आणि त्याची गर्लफ्रेंड सोफिया यांना अटक करण्यासाठी हे विमान दुसरं कोणी नाही तर बेलारुसच्या राष्ट्रपतींनीच उतरवलं. या घटनेनंतर युरोपिय संघाने कठोर भूमुका घेत त्यांच्या क्षेत्रातून बेलारुसच्या विमानांना उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. 27 देशांच्या युरोपियन संघाने त्यांच्या एअऱलाइन्सला आदेश दिले आहेत की, बेलारुसवरून विमान उड्डाण करू नये. (belarus ryanair plane hijack journalist roman protasevich arrest Europian union america)

युरोपिय संघाने अशीही घोषणा केली की, बेलारुस विरोधात आणखी जास्त निर्बंध लागू केले जातील. युनानहून लिथुआनियाला जात असलेल्या विमानाला बॉम्बची धमकी देत बेलारुसची राजधानी मिन्स्कमध्ये उतरवण्यात आलं. त्यानंतर विमानतळावर रोमन प्रोत्सेविचला अटक केली गेली. सोमवारी रोमनचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून यामध्ये बेलारुस प्रशासनाने केलेले आरोप तो मान्य करत असल्याचं दिसत आहे.

बेलारुस : राष्ट्रपतींकडून विमान हायजॅक; पत्रकाराला केली अटक
पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी एंटिग्वामधून बेपत्ता

रोमनला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपासाठी 15 वर्षांची शिक्षा होऊ शकते. बेलारुसचे राष्ट्रपती लुकाशेंको यांनी रविवारी त्यांचे मिग 29 लढाऊ विमान पाठवलं होतं. त्यांनी रयान एअरच्या विमानाला मिन्स्कमध्ये उतरवण्यास भाग पाडलं. याआधी बेलारुसच्या सरकारी टीव्ही चॅनेलवरून रोमनला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बेलारुस सरकारने त्याच्यावर अशांतता पसरवल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, बेलारुसच्या या वागण्याचा युरोपिय संघाने निषेध केला आहे. तसंच युरोपिय संघाने घेतलेल्या भूमिकेचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वागत केलं आहे. युरोपिय संघाने रोमन आणि त्याच्या गर्लफ्रेंडला तात्काळ सोडावं अशी मागणी केली आहे. लुकाशेंको हे सत्तेत राहण्यासाठी अशा प्रकारच्या दबावाचा वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com