बेलग्रेड : बॉक्सर आकाश कुमारला रौप्य

पदार्पणातच विश्व बॉक्सिंग स्पर्धेत थक्क करणारी प्रगती
बॉक्सर आकाश कुमारला रौप्य
बॉक्सर आकाश कुमारला रौप्यsakal

बेलग्रेड : पदार्पणातच विश्व बॉक्सिंग स्पर्धेत थक्क करणारी प्रगती करणारा भारताचा बॉक्सर आकाश कुमारला (५४ किलो) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. आज झालेल्या लढतीत कझाकस्तानच्या मखुमद सबयारखानकडून आकाश कुमार पराभूत झाला.

२१ वर्षीय आकाश उपांत्य फेरीच्या या सामन्यात ०-५ असे पराभूत झाला. विश्व बॉक्सिंग स्पर्धेत पदक मिळवणारा आकाश हा भारताचा सातवा खेळाडू ठरला आहे. ब्राँझपदकासह त्याने २५ हजार डॉलरची कमाईसुद्धा केली.

आकाश कुमारने सुरुवात तर शानदार केली होती, परंतु सबयारखानने लगेचच सामन्यावर वर्चस्व मिळवले. उजव्या हाताने पंच मारून त्याने आकाशला पाठीमागे टाकले. १९ वर्षीय सबयारखान हा कझाकस्तानचा राष्ट्रीय विजेता आहे. त्याचा प्रहार इतका जबरदस्त होता, की आकाशला प्रतिकार करण्याचीही संधी राहिली नाही.

बॉक्सर आकाश कुमारला रौप्य
Corona Update : राज्यात 1141 नवे रुग्ण तर 32 रुग्णांचा मृत्यू

पहिल्या राऊंडमध्ये सबयारखानने मोठी आघाडी घेतली, दुसऱ्या राऊंडमध्ये हीच आघाडी त्याने कायम ठेवली. या राऊंडमध्ये आकाशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला संधी मिळत नव्हती.

विश्व स्पर्धेतील भारताचे पदक विजेते

विजेंदर सिंग (ब्राँझ २००९), विकास क्रिशन (ब्राँझ २०११), शिवा थाबा (ब्राँझ २०१५), गौरव बिधुरी (ब्राँझ २०१७), अमित पंघल (२०१९), कौशिक (ब्राँझ २०१९) आणि आकाश कुमार (२०२१)

सप्टेंबरमध्ये आईचे निधन

उपांत्य सामन्यात पराभूत झाला असला तरी आकाश कुमारची या स्पर्धेतील प्रगती कौतुकास्पद ठरली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने माजी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याला पराभूत करून सर्वांची वाहवा मिळवली. सेनादलाचा हा बॉक्सर पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटमधून तयार झाला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याच्या आईचे निधन झाले, हे दुःख पचवून तो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत खेळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com