'आम्ही त्याला ओळखत नाही..' मुस्कानच्या वडिलांचं अल कायदा प्रमुखाला चोख प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayman al-Zawahiri

हिजाब प्रकरणी व्हिडिओ जारी करत भारतीय मुस्लिमांना चिथावण्याचं काम अल कायदा करत आहे.

'आम्ही त्याला ओळखत नाही..' मुस्कानच्या वडिलांचं अल कायदा प्रमुखाला प्रत्युत्तर

बंगळुरू : कर्नाटकसह भारताच्या विविध भागांमध्ये हिजाबवरून (Karnataka Hijab Row) सुरू असलेल्या वादामध्ये आता जागतिक दहशतवादी संघटनेनं उडी घेतलीय. या प्रकरणावर अल कायदानं (Al-Qaeda) भाष्य केलंय. अल कायदाचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये संघटनेचा प्रमुख अयमान-अल-जवाहिरीनं (Ayman al-Zawahiri) कर्नाटकातील हिजाबच्या वादामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुस्कान खानचं कौतुक केलंय. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये जवाहिरीनं मुस्कानला 'इंडियाज नोबल लेडी' असं संबोधलंय. मुस्कानच्या स्तुतीसाठी त्यानं एक कविताही पठण केलीय. दहशतवादी संघटनेनं जारी केलेली ही व्हिडिओ क्लिप 8.43 मिनिटांची आहे. याबाबत अमेरिकन SITE इंटेलिजन्स ग्रुपनं पडताळणी केलीय. मात्र, जवाहिरीच्या वक्तव्याला मुस्कानच्या वडिलांनी दोषी ठरवलंय. दहशतवादी संघटनेच्या नेत्याचं विधान 'खोटं' असून आम्ही त्याला ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. भारतात शांतता नांद असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा: हिजाब, हलालनंतर कर्नाटकात फळांच्या दुकानांवरून वाद

अरबी भाषेत प्रसिद्ध झालेली ही व्हिडिओ क्लिप अमेरिकेच्या SITE इंटेलिजन्स ग्रुपनं (American SITE Intelligence Group) इंग्रजी भाषेत अनुवाद करुन उपलब्ध करून दिलीय. हिंदू भारत आणि तेथील लोकशाहीचं वास्तव समोर आल्याचं जवाहिरीनं म्हंटलंय. या व्हिडीओमध्ये तो मुस्कानला त्याची बहीण म्हणत आहे. त्याच बरोबर त्यानं भारतीय मुस्लिमांना ‘या छळावर’ प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित केलंय. जवाहिरीनं हिजाब वादावर भारतातील मुस्लिमांना (Muslim Community) उत्तर देण्यास सांगितलंय. दुसरीकडं काश्मीर आणि इतर भागांना इस्लामिक झोन बनवण्याबाबत अल कायदा नेहमीच भाष्य करत आला आहे. अल कायदा काश्मीर आपलं पुढचं लक्ष्य असल्याचं म्हणत आहे. आता हिजाब प्रकरणी व्हिडिओ जारी करत भारतीय मुस्लिमांना चिथावण्याचं काम अल कायदा करत आहे.

हेही वाचा: पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

जवाहिरीचा हिजाब वाद (Hijab Controversy) आणि हिजाब गर्ल मुस्कान खानचं कौतुक करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांचं वक्तव्य समोर आलंय. असे व्हिडिओ निवेदन अल कायद्याचे षडयंत्र सिद्ध करते, असे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी सांगितलंय. गृहमंत्री म्हणाले की, गृह आणि पोलीस विभागाचे अधिकारी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, आम्ही हे सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहोत आणि हिजाबच्या निर्णयादरम्यान हायकोर्टानंही हिजाब वादामागे काही छुपे हात असण्याची शक्यता वर्तवली होती. आता हे सिद्ध झालं आहे. कारण, अल-कायदानं असा व्हिडिओ जारी केलाय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस (Police) करत आहे.

Web Title: Bengaluru News Alqaeda Chief Ayman Al Zawahiri Resurfaces To Slam Karnataka Hijab Row Praises Sister Muskan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..