निर्बंधाविरुद्ध जर्मनीत तीव्र निदर्शने

barlin
barlin

बर्लिन - मध्य बर्लिनमधील ब्रँडनबर्ग गेट परिसरात हजारो नागरिकानी कोरोना निर्बंधांबाबत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत निर्बंधांबाबत विधेयक मंजूर होणार असून त्याद्वारे सामाजिक संपर्क, मास्क घालण्याचे नियम, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दुकाने बंद करणे, क्रीडा स्पर्धा आयोजन थांबवणे अशा बाबतीत सरकारला व्यापक अधिकार मिळणार आहेत.

दुसरी लाट रोखण्यासाठी माफक लॉकडाउन (लॉकडाउन लाइट) बहुतांश नागरिकांना मान्य असले तरी कायद्यामुळे सरकारला अवास्तव अधिकार मिळतील आणि संसदेच्या मंजुरीशिवाय नागरी हक्कांवर गदा येईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निदर्शकांनी मर्केल यांचा निषेध करणारे फलक झळकावले होते. याशिवाय आत्मज्ञान, शांतता आणि स्वातंत्र्य अशा आशयाचे फलकही अनेकांनी झळकावले. बहुतांश निदर्शकांनी मास्क घातले नव्हते, तसेच एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखले नव्हते.

निदर्शक संसदेच्या इमारतीजवळ येऊ नयेत म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिटलरशी तुलना
अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाने १९३३ मधील कायद्याशी याची तुलना केली आहे. त्या कायद्यामुळे हिटलरच्या नाझी हुकुमशाहीचा मार्ग सुकर झाला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com