

FBI Most Wanted fugitive Bhadreshkumar Patel, accused of murdering his wife Palak Patel at a Dunkin’ Donuts store in Maryland in 2015, now carries a $1 million reward for information leading to his arrest.
esakal
अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने एका भारतीय वंशाच्या फरार गुन्हेगारासाठी बक्षीस रक्कमेत मोठी वाढ केली आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल ( ३५ वर्षे) हा संशयित त्याची पत्नी पलक पटेलच्या हत्येप्रकरणी २०१५ पासून फरार आहे. एफबीआय त्याचा कसून शोध घेत असून अद्याप तो सापडेलेला नाही. त्याच्या अटकेसाठी महत्त्वाच्या माहिती देणाऱ्या व्यक्तीला १ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ८.५ ते ९ कोटी रुपये) पर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ही रक्कम पूर्वी २.५ लाख डॉलर इतकी होती.