रशियापासून अमेरिकेला धोका; बायडेन यांचा दावा

वृत्तसंस्था
Tuesday, 27 October 2020

निवडणूकपूर्व मतदानाचा टक्का वाढला
अमेरिकेमध्ये यंदा अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकपूर्व मतदानाने २०१६ साली झालेल्या मतदानाची टक्केवारी ओलांडली आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० राज्ये आणि वॉशिंग्टन डीसीमधील ५८.७ दशलक्ष लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याआधी २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे प्रमाण ५८.३ दशलक्ष एवढे होते. कोरोनामुळे यंदा अमेरिकेत निवडणूकपूर्व मतदानाचे प्रमाण वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी  आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रशियावर निशाणा साधला. रशियापासूनच अमेरिकेला सर्वाधिक धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संरक्षणाच्या आघाडीवर रशियापासून आम्हाला मोठा धोका असून चीन आमचा सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा सगळा संघर्ष आम्ही कशा पद्धतीने हाताळतो यावरच आम्ही प्रतिस्पर्धी आहोत अथवा भविष्यामध्ये यापेक्षाही मोठ्या स्पर्धेला आम्हाला सामोरे जावे लागेल हे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अध्यक्षीय वादविवादाच्या शेवटच्या फेरीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर रशिया आणि ब्लादिमीर पुतीन यांच्याकडून त्यांनी ३.५ दशलक्ष डॉलर घेतल्याचा आरोप केला होता. बायडेन यांचा मुलगा हंटर यांचे मॉस्कोच्या माजी महापौराच्या पत्नी युरी लुझकोव्ह यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. बायडेन यांनी मात्र आपण परदेशातून एकही पैसा घेतला नव्हता,असे म्हटले आहे. या आरोप प्रत्यारोपाच्या वादामध्ये आता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे देखील उतरले आहेत. पुतीन यांनी अप्रत्यक्षरीत्या ट्रम्प यांचे म्हणणे खोडून काढले आहे. हंटर बिडेन यांनी रशिया आणि युक्रेनशी व्यावसायिक संबंध ठेवण्यात काहीही गैर नाही किमानपक्षी आम्हाला तरी त्यामध्ये तसे काहीही आढळून आले नसल्याचे म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेसबुकचे माहितीवर लक्ष
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला असताना आघाडीचे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुक निवडणुकीच्या अनुषंगाने व्हायरल होणाऱ्या माहितीच्या नियमनासाठी आपत्कालीन उपाययोजना आखण्याच्या विचारात आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biden claims threat from Russia to US