US Election - कोरोनाला हरवण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच बायडेन यांचा ऍक्शन प्लॅन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

बायडेन यांनी म्हटलं की, देशातील गोष्टींना ठिक करण्यासाठी देशाला एकत्र येण्याची हीच वेळ आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चुरस अजूनही संपलेली नाहीये. आकडेवारीनुसार, डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी नक्कीच बाजी मारलेली आहे. मात्र अधिकृत निकाल जाहीर व्हायला अजूनही वाट पहावी लागणार आहे. जॉर्जिया आणि पेन्सिल्व्हेनिया या महत्त्वपूर्ण राज्यातील विजयानंतर जो बायडन यांचा विजय जवळपास आता निश्चित झाला आहे. आणि आता बायडेन यांनी अधिकृतरित्या पदभार हातात मिळायच्या आधीच आपल्या कामास सुरवात देखील केली आहे. 

जो बायडेन यांनी म्हटलंय की आम्ही विजयाच्या अगदी जवळ आहोत. आम्ही 300 हून अधिक इलेक्टोरल व्होट्स प्राप्त करायच्या मार्गावर आहोत. त्यांनी काल शुक्रवारी म्हटलं की, पद मिळताच ते कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीशी लढण्यासाठी ते वेळ न वाया घालवताच तयारी सुरु करतील.

हेही पहा - आज काय विशेष : US Election : अमेरिकेचा हाय व्होल्टेज ड्रामा कधी संपणार?

बायडेन यांनी आपल्या विलमिंगटनमधील रात्री उशीराच्या संबोधनात म्हटलं की, मला असं वाटतं की कोरोनाला रोखण्यासाठी ज्या योजना आपण राबवणार आहोत, त्याची माहीती पहिल्या दिवसापासूनच आपल्याला असायला हवी. त्यांनी म्हटलंय की, आम्ही या व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच योजनेला अंमलात आणत आहोत. बायडेन यांनी असा विश्वासही व्यक्त केलाय की ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जरुर हरवतील. बायडेन यांनी आपल्या संबोधनादरम्यान देशाला एकजूट करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी म्हटलं की, देशातील गोष्टींना ठिक करण्यासाठी देशाला एकत्र येण्याची ही वेळ आहे. 

हेही वाचा - 'जो बायडन अमेरिकेचे प्रेसिडंट'; पेन्सिल्व्हेनियातील विजयानंतर डेमोक्रॅट्स निश्चिंत

व्हाईट हाऊसची शर्यत जिंकायची असेल तर कोणत्याही उमेदवाराला 538 इलेक्टोरल कॉलेज व्होटमध्ये 270 व्होट प्राप्त करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक हाय व्होल्टेज निवडणूक ठरली आहे. अमेरिका ही कोरोनाने सर्वाधिक बाधित ठरली आहे. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा हा सध्या 96 लाखांच्या पार गेला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biden Said i would waste no time to curb covid pandemic after taking office