US Election : 'जो बायडन अमेरिकेचे प्रेसिडंट'; पेन्सिल्व्हेनियातील विजयानंतर डेमोक्रॅट्स निश्चिंत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

पेन्सिल्व्हेनिया राज्यातील आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर आधीपासूनच जड असलेले बायडेन यांचं पारडं आणखीनच जड झालं आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. अद्याप औपचारिक निकाल जाहीर झालेला नाहीये. तो जाहीर व्हायला आणखी काही दिवस लागू शकतात, असं म्हटलं जातंय. मात्र, उपलब्ध आकडेवारी पाहता डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती पुरेशी स्पष्ट झाली आहे. पेन्सिल्व्हेनिया राज्यातील आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर आधीपासूनच जड असलेले बायडेन यांचं पारडं आणखीनच जड झालं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या काँग्रेसमधील वरिष्ठ डेमोक्रॅट आणि हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनीही वक्तव्य केलं आहे. 

पेलोसी यांनी निवडणुकीचे निकाल पुढे सरकल्यानंतर शुक्रवारी म्हटलंय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडले गेले आहेत. पेन्सिल्व्हेनियात जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडी घेतल्यावर पेलोसी या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, या सकाळीच हे स्पष्ट होईल की बायडेन आणि हॅरिस या व्हाईट हाऊसवर जिंकणार आहेत. त्या म्हणाल्या की, बायडेन यांच्याकडे पुरेसा जनमताचा कौल आहे, त्यामुळे तेच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.

हेही वाचा - US Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित
हा आपल्या देशासाठी आनंदाचा दिवस आहे. जो बायडेन हे 'युनिफायर' म्हणजेच एकत्र आणणारे आहेत कारण लोकांमध्ये एकत्र आणण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. पेन्सिल्व्हेनियातील विजयाने बायडेन यांना 270 इलेक्टोरल व्होट्सच्या जादूई आकड्यापर्यंत पोहोचवले आहे. आणि त्यामुळे त्यांचे राष्ट्राध्यक्षपद निश्चितच झाले आहे. 
जॉर्जिया राज्यातदेखील बायडेन यांनी किंचीतशी आघाडी घेतली आहे. ट्रम्प यांना हे आपले हक्काचे राज्य आहे आणि आपण निवडून येऊच असा विश्वास असल्याने त्यांनी फार लक्ष दिलं नव्हतं.

हेही पहा - आज काय विशेष : US Election : अमेरिकेचा हाय व्होल्टेज ड्रामा कधी संपणार?

दोन्ही डेमोक्रॅट्स उमेदवारांनी विजयाची घोषणा करण्याचे थांबवले होते. परंतु बायडेन आणि त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचाच विजय होईल अशी अपेक्षा आहे.
आधीच आपला विजय जाहीर केलेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी मतदान संपल्यानंतर रागाने फसवणूकीचे अनेक दावे केले होते आणि मतमोजणी थांबविण्याचाही प्रयत्न केला.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमोक्रॅट्स अनेक जागा गमावतील, असा अंदाज असूनही बायडेन यांनी चांगली कामगिरी केली. बहुमत वाढविण्याची आशा असलेल्या पक्षासाठी ही खरंकर मोठी निराशा होती.पहिल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्षांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये नेहमीच जागा गमावत असतो, असंही निरीक्षण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election 2020 house speaker nancy pelosi said bidens victory is confirm