Bangladesh accident: बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh accident: बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Bangladesh accident: बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू

बांगलादेशमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव वेगवान बस दरीत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू तर 30 जखमी झाले आहेत. बांगलादेशातील मदारीपूरमध्ये ही घटना घडली. ही बस इमाद परिवहनची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ढाकाकडे जाणारी ही बस सकाळी साडेसातच्या सुमारास मदारीपूर येथील एक्स्प्रेस वेवर नियंत्रणाबाहेर गेली आणि दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन सेवेच्या तीन तुकड्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यासाठी पोहचल्या आहेत. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही.

मदारीपूरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मसूद आलम यांनी दिलेल्या माहिती नुसार, अपघातग्रस्त जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'बस चालकाच्या निष्काळजीपणाने आणि यांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे दिसते. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :accident