टूलकिटमागे मोठे कारस्थान

वृत्तसंस्था
Wednesday, 17 February 2021

पर्यावरणविषयक  कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने वापरलेल्या टूलकिटचा उद्देश हा भारतालाच लक्ष्य करणे हा होता.

फेक न्यूजवर लक्ष्य ठेवणाऱ्या डिसइन्फो लॅबचा दावा
न्यूयॉर्क - पर्यावरणविषयक  कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने वापरलेल्या टूलकिटचा उद्देश हा भारतालाच लक्ष्य करणे हा होता.

२००७ पासून हे कारस्थान आखले जात आहे. यामध्ये आर्थिक अफरातफर करणाऱ्या अमेरिकेतील अनेक कंपन्या, बनावट परकी अभ्यासक, संस्था आणि व्यक्ती यांचा समावेश असल्याची बाब उघड झाली आहे. फेक न्यूजवर लक्ष्य ठेवणाऱ्या डिसइन्फो लॅब या संस्थेने ही माहिती दिली आहे. ग्रेटाने ही टूलकिट ट्विटरवर व्हायरल करण्यापूर्वी पीटर फ्रेडरिक या परकी तज्ज्ञाचे नाव अनावधानाने डिलीट केले होते. भारताविरोधात छेडण्यात आलेल्या  इन्फोवॉरमध्ये पीटर हा अनेक दिवसांपासून सहभागी होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही मंडळी २००७ पासून भारताविरोधात नियोजनबद्धरितीने कारस्थान आखत असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसक भारताच्या संकल्पनेला छेद देत भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर फॅसिस्ट अशी प्रतिमा तयार करणे, हा या मंडळींचा प्रमुख उद्देश आहे. भारतीय सार्वभौमत्वावर हल्ला करत ही मंडळी के-टू डिझाईनच्या निर्मितीसाठी काम करते आहे. यामध्ये (काश्‍मीर- खलिस्तान) यांचा समावेश होतो, असेही या संस्थेने म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The big conspiracy behind the toolkit