US Visa : भारतीय विद्यार्थ्यांची चांदी, अमेरिकेनं दिला रेकॉर्ड ब्रेक व्हिसा!

इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांना सर्वाधिक व्हिसा देण्यात आला असून याचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Visa
Visae sakal

वॉशिंग्टन : भारतातील विद्यार्थ्यांना यंदा अमेरिकेकडून इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक व्हिसा मिळाले आहेत. दिल्लीतील यूएस दूतावासाने बुधवारी याबाबत माहिती दिली. दि युएस मिशन इन इंडिया या मोहिमेंतर्गत हे व्हिसा देण्यात आले आहेत. त्यामुळं ही बाब भारतीय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. (Big news for Indian students USA gave record break visa)

यूएसमध्ये शिकणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास 20 टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2021 मधील ओपन डोअर अहवालानुसार, 2020-2021 शैक्षणिक वर्षात भारतातून जवळपास 1.7 लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. त्यानंतर यंदा सन 2022 मध्ये रेकॉर्डब्रेक 82,000 विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत, जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत. अमेरिका हा बहुतांश भारतीय कुटुंबांना उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक मागणी असलेला देश आहे, अशी माहिती अमेरिकन दुतावासानं दिली आहे.

विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड करावं

दिल्लीतील अमेरिकन दूतावास आणि चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईतील चार वाणिज्य दूतावासांनी मे ते ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेला प्राधान्य दिलं. कारण यामुळं शक्य तितक्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या कालावधीत पोहोचता यावं, असंही दूतावासानं एका निवेदनात म्हटलं आहे. कॉन्सुलर अफेयर्सचे मंत्री समुपदेशक डॉन हेफ्लिन म्हणाले, “आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची गतिशीलता ही अमेरिकनं डिप्लोमसीमध्ये केंद्रस्थानी आहे. दूतावासानं असं आवाहन केलंय की, अमेरिकेत शिकण्यासाठी सहाय्य शोधणाऱ्या विद्यार्थ्यांनी EducationUSA IndiaApp डाउनलोड करावे. महाविद्यालयीन अर्ज प्रक्रियेबद्दल नवी माहिती मिळविण्यासाठी iOS आणि Android मोबाईलवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे.

भारतानं टाकलं चीनला मागे

25 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित झालेल्या नव्या यूके इमिग्रेशन आकडेवारीनुसार, जून 2022 रोजी संपलेल्या वर्षात सुमारे 1,18,000 भारतीय विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसा मिळाला जो मागील वर्षाच्या तुलनेत 89 टक्के जास्त. यूकेमध्ये प्रायोजित अभ्यास व्हिसा मिळावणाऱ्या देशात भारताने आता चीनला मागे टाकलं आहे. त्याचबरोबर कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांकडून व्हिसा अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत. प्रचंड गर्दीमुळे अनेक देशांच्या मोहिमांमध्ये, विशेषतः कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com