esakal | बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय

बोलून बातमी शोधा

Bill and Melinda Gates

१९९४ मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले होते. असं म्हणतात की, तेथील गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी बरीच हेलिकॉप्टर भाडे तत्वावर घेतली होती.

बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय
sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे मंगळवारी (ता.४) जाहीर केले. २७ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. यापुढे ते एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, असं कारण त्यांनी दिलं आहे. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था ते चालवतात आणि यासाठी ते यापुढेही एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बिल गेट्स यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, खूप चर्चा आणि नात्यासंबंधी विचार केल्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या २७ वर्षात तीन मुलांचं संगोपन करत त्यांना मोठं केलं. तसेच जगभरातील लोकांना निरोगी आणि चांगलं आयुष्य जगता यावं, अशा संस्थेचीही स्थापना केली.

हेही वाचा: "IPL साठी सरकारने परवानगी दिली; आता पलटी मारू नका"

दरम्यान, बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांची १९८७ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. १९९४ मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले होते. असं म्हणतात की, तेथील गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी बरीच हेलिकॉप्टर भाडे तत्वावर घेतली होती. बिल गेट्स हे पूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचे ते मालक होते.

बिल गेट्स यांच्या वडिलांचे बिल गेट्स सीनियर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून अल्झायमरने ग्रस्त होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.