esakal | "IPL साठी सरकारने परवानगी दिली; आता पलटी मारू नका"
sakal

बोलून बातमी शोधा

IPL

"IPL साठी सरकारने परवानगी दिली; आता पलटी मारू नका"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणारे मायकल स्लेटर यांनी आपल्या पंतप्रधानांवर टीका केलीये. भारतातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतातून ऑस्ट्रेलियातील विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेऊन मायदेशी परतण्याच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलिय खेळाडूंची चांगलीच गोची झाली आहे. स्पर्धेला बायबाय केल्यानंतर अजूनही खेळाडू भारतात अडकून आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात परतण्याची परवानगी नाकारणाऱ्या पंतप्रधानांवर मायकल स्टेलर यांनी निशाणा साधलाय. खेळाडूंना परवानगी नाकारण्याचा पंतप्रधानांचा निर्णय हा अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

आयपीएलमध्ये जोडले गेलेल्या खेळाडूंनी परत येण्याची व्यवस्था स्वत: करावी, अशी भूमिका ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी घेतली होती. यासंदर्भात मायकल स्लेटर यांनी एक ट्विट केलंय, जर आमच्या सरकारला ऑस्ट्रेलियन नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची वाटत असेल तर ते आम्हाला मायदेशी परतण्याची परवानगी देतील. जर सध्याच्या घडीला पंतप्रधानांनी घेतलेली भूमिकाही अपमानजनक वाटते. कोणत्याही अनुचित प्रकाराला तुम्ही जबाबदार असाल. आमच्यासोबत तुम्ही असे वागू शकत नाही. क्वारंटाईन प्रणालीमध्ये सुधारणा करायची जबाबदारी तुमची आहे. आयपीएलमध्ये काम करण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा: IPL च्या संघात संधी देतो सांगून मुंबईकर तरूणाची फसवणूक

ऑस्ट्रेलिया सरकारने भारतात असलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी अस्थायी स्वरुपात निर्बंध घातले आहेत. 15 मे पर्यंत भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या घडीला स्टेलर आयपीएलच्या बायोबबलमधून बाहेर पडले असून ते मालदीवला गेले आहेत. मालदीववरुन मायदेशी परतण्याचा प्लॅन त्यांनी आखला आहे.

loading image