Jagannath Temple : भारतीय वंशाच्या अब्जाधीशाकडून २५० कोटी दान! ब्रिटनमध्ये बांधलं जाणारं पहिलं जगन्नाथ मंदिर

billionaire biswanath patnaik donated 250 crore  for uk s first jagannath temple know details
billionaire biswanath patnaik donated 250 crore for uk s first jagannath temple know details

लंडनमधील ब्रिटनमधील पहिल्या जगन्नाथ मंदिराच्या बांधकामासाठी भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने 250 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ओडिशाचे रहिवासी विश्वनाथ पटनायक यांनी ही रक्कम मंदिराच्या बांधकामावर काम करणाऱ्या ब्रिटीश धर्मादाय संस्थेला देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या मंदिराचा पहिला टप्पा पुढील वर्षअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दरम्यान परदेशात मंदिरासाठी दिलेले आजपरचे हे सर्वात मोठे दान आहे. इंग्लंडमधील चॅरिटी कमीशनमध्ये नोंदणीकृत श्री जगन्नाथ सोसायटी (एसजेएस) यूकेने सांगितले की, रविवारी अक्षय्य तृतीयेला यूकेमध्ये झालेल्या पहिल्या जगन्नाथ संमेलनादरम्यान ही घोषणा करण्यात आली.

70 कोटींमध्ये खरेदी होणार 15 एकर जमीन

या कार्यक्रमात बोलताना पटनायक यांनी भाविकांना ब्रिटनमधील जगन्नाथ मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. लंडनमधील 'श्री जगन्नाथ मंदिरा'साठी सुमारे 15 एकर जमीन खरेदी करण्यासाठी 250 कोटी रुपयांपैकी 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

billionaire biswanath patnaik donated 250 crore  for uk s first jagannath temple know details
Barsu Refinery Protest : उद्योगमंत्री अन् शरद पवार भेटीमध्ये काय झालं? सामंत म्हणाले…

एक योग्य जमीन शोधण्यात आली आहे आणि ती सध्या खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि मंदिर बांधण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी स्थानिक सरकारी परिषदेकडे पूर्वनियोजन अर्ज सादर करण्यात आला आहे. SJS अध्यक्ष डॉ सहदेव स्वेन यांच्या मते, हे मंदिर युरोपमधील जगन्नाथ संस्कृतीचे प्रतीक आणि जगभरातील हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करणारे तीर्थक्षेत्र बनेल.

billionaire biswanath patnaik donated 250 crore  for uk s first jagannath temple know details
Mukesh Ambani : निष्ठावान सहकाऱ्याला अंबानींचं जम्बो गिफ्ट! दिलं १५०० कोटींचं घर

कोण आहेत विश्वनाथ पटनायक?

पटनायक हे फिननेस्ट ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, जे इलेक्ट्रिक वाहने (EVs), हायड्रोजन लोकोमोटिव्ह इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात. बँकरपासून उद्योजक बनलेले पटनायक यांनी अर्थशास्त्रात एमबीए, एलएलबी आणि बीए केले आहे.

अनेक वर्ष बँकिग क्षेत्रात काम केल्यानंतर 2009 मध्ये त्यानी उद्योगजगतात प्रवेश केला. पटनायक यांनी अलीकडेच ओडिशामध्ये ईव्ही-हायड्रोजन ट्रक आणि कमर्शियल अवजड वाहन निर्मिती प्रकल्पात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. पटनायक यांची गुंतवणूक हेल्थकेअर, फिनटेक, रिन्युएबल एनर्जी ते दुबईतील सोन्याच्या रिफायनरी आणि बुलियन ट्रेडिंगपर्यंत विविध पोर्टफोलिओमध्ये त्यांची गुंतवणूक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com