'ब्लॅक पँथर' काळाच्या पडद्याआड 

टीम ई-सकाळ
Saturday, 29 August 2020

हॉलिवूड मधील सुपरहिट चित्रपट 'ब्लॅक पँथर'चा अभिनेता चाडविक बोसमन याचे निधन झाले आहे.

हॉलिवूड मधील सुपरहिट चित्रपट 'ब्लॅक पँथर'चा अभिनेता चाडविक बोसमन याचे निधन झाले आहे. आज शनिवारी 43 वर्षीय चाडविक बोसमनने कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला आहे. ब्लॅक पँथर आणि अव्हेंजर्स सारख्या चित्रपटात दमदार कामगिरी केलेल्या चाडविक बोसमनच्या जाण्यामुळे हॉलीवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनानंतर चाहत्यांपासून ते कलाकार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहात आहेत.

चाडविक बोसमन हा गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. त्यानंतर आज त्याची ही झुंज संपली. त्याला मोठ्या आतड्याचा कर्करोग म्हणजे कोलन कॅन्सर होता. चाडविक बोसमनच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अधिकृत सोशल मीडियाच्या ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

दरम्यान, यापूर्वी बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये ठसा उमटवलेला व आपल्या दमदार अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने सिनेरसिकांचे मन जिंकणारा अभिनेता इरफान खानला देखील कोलन कॅन्सर झाला होता. आणि यावर्षीच्या 29 एप्रिलला इरफान खानचे निधन झाले होते.      

कोलन कॅन्सर म्हणजे काय? 
कोलनला कोलायटिस देखील म्हटले जाते. बॅक्टेरिया, पॅरासाईट्स आणि व्हायरस यांच्यामुळे हा संसर्ग होऊ शकतो. 

खाल्लेले अन्नपदार्थ शरिरात जाऊन ते पचण्यासाठी आपले शरीर एक प्रकारचे द्रव पदार्थ मोठ्या आतड्यात तयार करत असते. तसेच पचनासाठी जड असलेले पदार्थ वेगळे केले जातात. ही सर्व प्रक्रिया आतड्यांमध्ये होत असते. तर नको असलेले विषारी पदार्थ कोलनमध्ये साठून ते मेलद्वारे शरारबाहेर फेकले जातात. 

मात्र या कोलनला संसर्ग झाल्यास अतिसार आणि ताप येण्यास सुरवात होते. याशिवाय पोटात दुखणे, थकवा येणे, बद्धकोष्ठता, शौचास त्रास होणे ही समस्या होऊ शकते. 
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Panther actor Chadwick Bosman has died