Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! एका तासात दोन बॉम्ब स्फोट, मशिदीमध्ये आत्मघातकी हल्ला

पाकिस्तान स्फोट: Two bomb blasts in one hour!
Pakistan Blast
Pakistan BlastSakal Digital

इस्लामाबाद-

एका तासात पाकिस्तानमध्ये दोन बॉम्ब स्फोट झाले आहेत. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या भीषण स्फोटात ५२ लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यातच पाकिस्तानमध्ये आणखी एक बॉम्ब स्फोट झाला. खैबर पख्तूनवा प्रांतात मशिदीमध्ये आत्मघातकी स्फोट घडवण्यात आला. त्यात कमीतकमी चार लोकांचा मृत्यू झालाय. अल जजिराने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे झालेल्या स्फोटात किमान ५२ लोकांचा मृत्यू झालाय, तर २५ हून अधिक जण जखमी झालेत. ईद मिलादुन नबी निमित्त लोक जमत असलेल्या मशिदीजवळ हा स्फोट झाला होता. त्यानंतर दुसरा स्फोट हांगू जिल्ह्यात झाला. ३० ते ४० लोक मशिदीमध्ये होते. तेव्हा हा स्फोट झाला. त्यामुळे अनेकजण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Blast hits mosque in Khyber Pakhtunkhwa)

Pakistan Blast
World Cup 2023 : पाकिस्तान संघाचं मुर्दाबादच्या घोषणेनं झालं स्वागत; सोशल मीडियावरील Video चं काय आहे सत्य?

पाकिस्तानातील वृत्तानुसार, हांगूमध्ये दुसरा बॉम्ब स्फोट झाला. त्यात चार लोकांचा मृत्यू झालाय. यात एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. एक स्फोट गेटच्या जवळ झाला. जेथे लोक मोठ्या संख्येने होते. दुसरा स्फोट मशिदीमध्ये झाला. स्फोटामुळे मशिदीचे छत कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. (Latest Marathi News)

Pakistan Blast
Pakistan: पाकिस्तानी नागरिकांवर अशीही वेळ, विदेशात जाऊन मागतायेत भीक; पाकच्या अधिकाऱ्याची कबुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com