esakal | चीनमधील अमेरिकन दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

Blast near US embassies in China

चीनमधील अमेरिकन दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बीजिंग : चीनची राजधानी बीजिंग मधील अमेरिकन दुतावासाबाहेर भीषण बॉम्ब स्फोट झाला. आज गुरवार (ता.26) दुपारी 1 वाजता ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कसल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

दुतावासातील सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, दुपारी 1 वाजता अमेरिकन दुतावासाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या मोकळ्या जागेत हा स्फोट झाला. एका व्यक्तीने दुतावासाच्या गेटवर बॉम्ब फेकल्यानंतर हा स्फोट झाला. यामध्ये एका व्यक्तीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून, जियांग मौऊमऊ (वय 26 वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो मंगोलियातील टोंगालियो शहरातून आला होता. पोलिसांकडून या स्फोटाचा कसून तपास सुरू आहे. दुतावासाच्या परिसरतील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. 

असे असले तरी चिनी आणि अमेरिकन प्रशासनाकडून स्फोटा विषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने दुतावास आणि आजूबाजूचा परिसर बंद ठेवण्यात आला आहे. 

loading image