रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो प्रचंड व्हायरल

कार्तिक पुजारी
Monday, 10 August 2020

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतरचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातच एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बैरत- लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतरचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातच एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये एक बाप रक्ताळलेल्या कपड्यात असून त्याने नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलाला हातात घेतल्याचं दिसत आहे. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर काही मिनिटातच या मुलाने जन्म घेतला होता. स्फोटाने परिसरातील सर्व इमारती उद्धवस्त झाल्या होत्या. रुग्णालयाचेही नुकसान झाले होते. अशा कठिण परिस्थिती आईने मुलाला जन्म दिला आहे. बाप या चिमुकल्याला हातात घेताच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

ब्राझीलची अमेरिकेच्या दिशेने वाटचाल; कोविड-19 मृतांचा आकडा धडकी भरवणारा

बैरुतच्या बंदराजवळ ठेवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट झाला होता. यात 158 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6000 लोक यात जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की 120 किलोमीटर दूर असणाऱ्या सायप्रसपर्यंत हादरे बसले होते. अशी परिस्थितीत क्रिस्टलने स्फोटानंतर काही मिनिटातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. एल रोअम रुग्णालय स्फोटाच्या ठिकाणापासून जवळच्याच अंतरावर आहे. स्फोटाने रुग्णालयाच्या काचा फुटल्या. यावेळी बाळाच्या वडिलांनी मुलाला आमल्या कुशीत घेतलं होतं, तर बाळाची आई काचांनी भरलेल्या बेडवर होती. 

ती खूप कठीण स्थिती होती. स्फोट झाला यावेळी आम्ही रुग्णालयाच्या रुममध्ये होतो. आम्हाला कळालंच नाही काय घडलं. सर्वकाही अत्यावस्थ पडलं होतं, काहीच ठिकाणावर राहिलं नव्हतं. मला आणि माझ्या पत्नीला दुखापत झाली होती. मी तात्काळ बाळाला माझ्या कुशीत घेतलं आणि संरक्षणासाठी कोपरा गाठला. दुसऱ्या स्फोटानंतर माझा थरकाप उडाला होता, असं सवाया यांनी सांगितलं. 

इतर शेजाऱ्यांशी संबंध बिघडत असताना एकाने दिली भारताला साथ

सवाया यांनी आपल्या बाळाचं नाव नाबील ठेवलं आहे. नाबील आपल्या आईच्या बाजूला बेडवर होता. माझ्या डोक्याला आणि नाकाला जखम झाली होती. क्रिस्टलच्याही डोक्याला लागलं होतं. मात्र, देवाच्या कृपेने नाबिलला काहीही झालं नाही. मी मुलाला घेतलं, तर एका अनोळखी माणसाने माझ्या पत्नीला बाहेर काढण्यास मदत केल्याचं सवाया यांनी सांगितलं. बैरुत स्फोटानंतर अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, गेले सहावर्षे अमोनियम नायट्रेंटचा साठा बंदरावर पडून होता. मात्र, याकडे कोणत्याही राजकारण्याचे लक्ष नव्हते. या मुद्द्यावरुन लेबनॉनी नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bloodied Clothes Newborn In His Arms Photo Captures Beirut Blast Horror