Boat sinks off Syrian coast: सीरीया किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाल्याने 34 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boat Capsizes off Syrian Coast

Boat sinks off Syrian coast: सीरीया किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाल्याने 34 जणांचा मृत्यू

Syria: सीरीयाच्या किनारपट्टीवर प्रवास करत असलेली बोट बुडाल्याने ३४ स्थलांतरितांचा मृत्यू झालाय. बोटमधील १४ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर टार्टौस येथील बासेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटमध्ये एकूण १२० ते १५० लोक असल्याचे सांगितले जातेय.

सीरीयाच्या वाहतुक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट लेबनॉनच्या उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात जवळपास दीडशे प्रवासी होते. बहुतेक स्थलांतरित लेबनीज आणि सीरियन होते तर काहींचे ओळखपत्र न मिळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा: Boat Sank : उत्तर प्रदेशात मोठा अपघात; यमुनेत ३० जण बुडाले, चौघांचे मृतदेह सापडले

एकूण ६ मिलीयन सीरियन लोकांपैकी १ मिलीयन सिरियन बेकायदेशिरपणे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात एप्रिलमध्ये, लेबनीज नौदलाने पाठलाग केलेली गर्दीने भरलेली स्थलांतरित बोट लेबनॉनच्या त्रिपोलीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू होता.

हेही वाचा: Landslide : कांदाटी खोऱ्यात दरडीखाली दबून 68 जनावरांचा मृत्यू

तर सप्टेंबरमध्ये, तुर्कीच्या कोस्टगार्डने दोन बाळांसह सहा स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली आहे. मुग्ला प्रांताच्या नैऋत्य किनारपट्टीवरून युरोप गाठण्याचा प्रयत्न करत असलेल्या 73 लोकांना वाचवण्यात यावेळी यश आले. हे प्रवासी ते इटलीला जाण्यासाठी लेबनॉनमधील त्रिपोली येथून चढले होते.

Web Title: Boat Capsizes Off Syrian Coast 34 Dead 14 Rescued Taking Treatment At Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathSeaboat