
पाकिस्तान सरकारने या दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्या वाडवडिलांच्या या जुन्या घरांना ऐतिहासीक वारसा दर्जा दिला आहे. फाळणीपूर्वी या घरांमध्ये दिलीपकुमार आणि राज कपूर या अभिनेत्यांचे बालपण गेले आहे.
पेशावर - बॉलिवूडमधील महान अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या पूर्वजांची घरे पाकिस्तानमधील पेशावरमध्ये आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या घरांच्या किमती खैबर पख्तुन्ख्वा सरकारने निश्चित केल्या आहेत. यानुसार, दिलीपकुमार यांच्या घराची किंमत ८० लाख ५६ हजार रुपये , तर राज कपूर यांच्या घराची किंमत १ कोटी ५० लाख रुपये अशी निर्धारित करण्यात आली आहे. पडझड झालेली ही घरे पालिकेकडून पाडली जाऊ नये म्हणून प्रांतिक सरकारने ती विकत घेऊन जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाकिस्तान सरकारने या दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्या वाडवडिलांच्या या जुन्या घरांना ऐतिहासीक वारसा दर्जा दिला आहे. फाळणीपूर्वी या घरांमध्ये दिलीपकुमार आणि राज कपूर या अभिनेत्यांचे बालपण गेले आहे. राज कपूर यांचे पूर्वजांचे घर ‘कपूर हवेली’ म्हणून ओळखले जाते. ते किस्सा ख्वानी बझार भागात आहे. १९१८ ते १९२२ या कालावधीत ते राज कपूर यांचे आजोबा दिवान बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधले होते. राजकपूर यांचा जन्म याच हवेलीत झाला. दिलीप कुमार यांचे घरही याच भागात आहेत.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा