esakal | इंडोनेशियात तीन ठिकाणी स्फोट; 6 जण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia

पूर्व जावा पोलिस पथकाचे प्रवक्ते फ्रान्स बारुंग मंगेरा यांनी सांगितले, की या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची ओळख पटली आहे. स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन पोलिसांसह अन्य काही जण जखमी झाले आहेत. 

इंडोनेशियात तीन ठिकाणी स्फोट; 6 जण ठार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सुराबाया : इंडोनेशियातील सुराबाया शहरात आज (रविवार) सकाळी तीन ठिकाणी चर्चबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जण ठार झाले असून, 35 हून अधिक जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुराबाया शहरात तीन ठिकाणी झालेल्या स्फोटांपैकी एक स्फोट हा आत्मघाती हल्ला होता. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास पहिला स्फोट झाला. त्यानंतर दहा मिनिटांच्या अंतराने इतर स्फोट झाले. अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला आहे.

loading image