बोस्निया नरसंहाराला 25 वर्षे पूर्ण; 8 हजार मुस्लिमांची झाली होती हत्या

bosniya
bosniya

सारायेवो- 11 जूलै 1995 रोजी, बोस्नियाची राजधानी सारायेवोपासून 80 किलोमीटर दूर असणाऱ्या सेब्रेनिस्ता शहराच्या नागरिकांना त्यांच्यासमोर काय वाडून ठेवलंय याची कल्पना नव्हती. सर्व लोक आपापल्या कामात गुंतले होते. अचानक शहरात सर्ब सैनिकांच्या शेकडो गाड्या येऊन धडकल्या. गृहयुद्धामुळे पेटलेल्या बोस्नियात स्वातंत्र्याची मागणी करणारे प्रदर्शन करणाऱ्या लोकांना पाहताच क्षणी गोळ्या घालण्यात आल्या.

8000 मुस्लिमांना गोळ्या घालण्यात आल्या

एका अनुमानानुसार बोस्नियाच्या सर्ब सैनिकांनी जवळजवळ 8000 मुस्लिमांना जागेवर मारुन टाकलं. मृतांमध्ये 12 ते 77 वर्षांच्या आतील पुरुषांचा समावेश होता. हा नरसंहार इतका भीषण होता की अनेकांना पाँईट ब्लैंक रेंजने डोक्याच्या मधोमध गोळी मारण्यात आली होती. या नरसंहारानंतर बोस्नियाचा पूर्व सर्ब कमांडर जनरल रैट्को म्लाडिच याला बूचर ऑफ बोस्निया म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

बोस्नियातील गृहयुद्ध

1992 मध्ये यूगोस्लावियाच्या विभाजनानंतर बोस्नियाच्या मुसलमानांनी आणि क्रोएशियाच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी जनमत घेण्याच्या बाजूने मत दिलं होतं, तर सर्बियाच्या लोकांनी यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सर्ब समुदाय आणि मुस्लिम समुदायामध्ये नवा देश निर्मितीच्या मुद्द्यावरुन तंटा निर्माण झाला.

दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष

"भारत-चीन संघर्ष झाल्यास डोनाल्ड ट्रम्प भारताला साथ देणार नाहीत"
सर्ब आणि मुस्लिमांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यावेळी कोणीही नव्हतं. त्यामुळे दोन्ही पक्षांनी शस्त्रास्त्राच्या जोरावर एकमेकांवर हल्ले सुरु केले. या गृहयुद्धात हजारो लोक मारले गेले, तर लाखो लोकांना विस्थापीत व्हावं लागलं.

सर्ब कमांडर रैट्को म्लाडिचचा नरसंहार

सर्ब लोकांना वाटत होतं की, बोस्नियाच्या मुस्लिमांची संख्या कमी असूनही ते आपल्यावर अधिकार दाखवत आहेत. यावेळी सर्ब सैन्याची कमान जनरल रैट्को म्लाडिच याच्याकडे देण्यात आली. या क्रूर कमांडरने बोस्नियाच्या गृहयुद्धात नरसंहार सुरु केला. त्याने त्या प्रत्येकाची हत्या केली ज्यांनी सर्ब सत्तेला विरोध केला.

या भीषण नरसंहारानंतर रैट्को म्लाडिच 15 वर्ष फरार होता. त्यानंतर 26 मे 2011 रोजी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे याला अटक करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय युद्ध अपराध न्यायाधिकरणाने त्याला दोषी ठरवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com