Video: 'बॉस'ने धुतले सहकाऱयांचे पाय...

वृत्तसंस्था
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

चीनमधील एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने (बॉस) आपल्या सहकाऱयांचे पाय धुतले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिजींग : चीनमधील एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने (बॉस) आपल्या सहकाऱयांचे पाय धुतले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्सनी आपल्यालाही असाच बॉस असावा, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका कॉस्मॅटिक कंपनीला यंदाच्या वर्षात दुप्पट फायदा झाला. कंपनीने त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीदरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या 8 सहकाऱयांचे स्टेजवर बोलवण्यात आले. खुर्च्यांवर बसलेल्या आठ सहकाऱयांचे बॉसने चक्क पाय धुतले व त्यांना सन्मानित केले. जगभरातून या कंपनीच्या बॉसचे कौतूक होऊ लागले आहे. बॉस असावा तर असा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

कंपनीचा बॉस म्हणाला, 'सर्वच कंपन्या कर्मचाऱ्यांना बक्षिस देतात. पण, आमच्या सहकाऱयांना प्रेरणा देण्यासाठी काही तरी वेगळे करण्याचा विचार केला. शिवाय, त्यांचे मनोबल अजून वाढावे म्हणून चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱयांचे पाय धुतले.'

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बॉसचे कौतूक केले जात आहे. काही नेटिझन्सनी आपल्या बॉसला ट्रोल केले आहे. एकाने म्हटले आहे की, 'कंपनी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची कदर आहे, हे पाहून आनंद झाला. यामुळे कर्मचाऱ्यांने नक्कीच मनोबल वाढते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boss respected the workers by washing her feets