esakal | VIDEO : 2021 चे स्वागत करणारे नाचरे रोबोट्स; 2020 च्या कटू आठवणींना क्षणार्धात विसरवणारा 'झिंगाट' डान्स
sakal

बोलून बातमी शोधा

dancing robots

या रोबोट्सची थिरकणारी कंबर आणि गाण्याच्या ठेक्यावरची लकब पाहून थक्क व्हाल. 

VIDEO : 2021 चे स्वागत करणारे नाचरे रोबोट्स; 2020 च्या कटू आठवणींना क्षणार्धात विसरवणारा 'झिंगाट' डान्स

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हे काही ऍनिमेशन नाही आणि एखाद्या चित्रपटातील दृश्य तर नाहीच नाही. या प्रकारचा डान्स आपण यापूर्वी क्वचितच पाहिला असेल तेही एखाद्या हॉलीवूडपटमध्ये. मात्र, हे आहेत खरेखुरे नाचरे रोबोट्स. बोस्टन डायनामिक्स या रोबोट्स बनवणाऱ्या कंपनीने अलिकडेच 2021 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या रोबोट्सना 'डू यू लव्ह मी' या एका इंग्रजी गाण्यावर थिरकायला लावले. त्यांच्या या 'झिंगाट डान्सचा' व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. २०२१ आणि त्यानंतरचा काळ ह्युमनॉईडस्, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार आहे.  कदाचित, पुढच्या दहा वर्षांनी या गोष्टी कुतुहलाच्या राहणार नाहीत, इतक्या सर्वसाधारणही होऊन जातील. त्याची झलक बोस्टन डायनॅमिक्सच्या नाचऱ्या रोबोटनी आज दाखवलीय.

अवघ्या दोन मिनीट 53 सेंकदाचा हा व्हिडीओ आपल्याला वेड लावून जातो. यामध्ये दिलखुलास डान्स करताना आपण ऍटलास हा ह्युमनॉइड आणि एक रोबोट डॉग पाहू शकतो. या व्हिडीओच्या शेवटी त्यांच्या डान्समध्ये सहभागी होणारा 'हँडल' आहे. असा रोबोट जो बॉक्स उचलायला तसेच पॅक करण्यासाठीच डिझाइन केला गेला आहे. या रोबोट्सची थिरकणारी कंबर आणि गाण्याच्या ठेक्यावरची लकब पाहून थक्क व्हाल. 
हा व्हिडीओ शेअर करताना कंपनीने लिहलंय की, बोस्टन डायनामिक्सकडून सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बोस्टन डायनॅमिक्स १९९२ ला स्थापन झालेली सध्या जपानी मालकीची अमेरिकन कंपनी. काही काळ या कंपनीवर गूगलचीही मालकी होती. या कंपनीचा संस्थापक मार्क रेलबर्ट आहे. बोस्टन डायनॅमिक्स कंपनीचा अॅटलास रोबोट हा ह्युमनॉईड, म्हणजे मानवासारख्या आकाराचं यंत्र. याशिवाय, स्पॉट, हँडल, पीक (pick) असे नावाप्रमाणं काम करणारे आणखी तीन रोबोटस् आहेत. 

हेही वाचा - पाकिस्तानात उद्ध्वस्त केलं ऐतिहासिक हिंदू मंदिर; जीर्णोद्धाराची मागितली होती परवानगी

बोस्टनच्या रोबोटचं वैशिष्ट्य असं, की त्यांना 'पाय' असतात! मार्क रेलबर्ट याचं म्हणणं आहे की, नैसर्गिक आणि प्रगत मोबिलिटीसाठी (हालचालींसाठी) पाय असाधारण महत्वाचे आहेत. उद्याच्या जगातली कामं करायची, तर प्रगत हालचाल हवीय. म्हणून त्याच्या रोबोंना वेगवेगळ्या प्रकारचे छान 'पाय' असतात. हा विचार मार्कनं केला, त्याला तीस वर्षे झालीयत! ट्विटरवर हा व्हिडीओ 1.1 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेलाय. हा व्हिडीओ टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना देखील भुरळ पाडणारा ठरला. त्यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. अलिकडेच बोस्टन डायनामिक्सने आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये रोबोट डॉगच्या अनेक कसरती दाखवण्यात आल्या आहेत.

loading image