पाकिस्तानात उद्ध्वस्त केलं ऐतिहासिक हिंदू मंदिर; जीर्णोद्धाराची मागितली होती परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

या मंदिरावर झुंडीने याप्रकारे हल्ला केलाय की, या मंदिराला पूर्णपणे नेस्तनाबूतच केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटच्या करक जिल्ह्यात बुधवारी स्थानिक मोलवींच्या नेतृत्वाखाली एका उन्मादी झुंडीने हिंदू मदिरांला नेस्तनाबूत केलं आहे. एवढचं नव्हे, तर या झुंडीने मंदिराला आग देखील लावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, अनेक लोक मंदिराच्या भींतींना तसेच छताला तोडताना दिसत आहेत. या मंदिरावर झुंडीने याप्रकारे हल्ला केलाय की, या मंदिराला पूर्णपणे उद्ध्वस्तच केले आहे. पाकिस्तानात घडणारी अशाप्रकारची ही काही पहिली घटना नाहीये. याआधी देखील पाकिस्तानात मंदिरांवर याप्रकारचे हल्ले झालेले आहेत. 

हेही वाचा - गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक या देशात बहुमताने मंजूर​
मूकदर्शकाच्या भुमिकेत स्थानिक प्रशासन
वॉयर ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन देखील या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला गेलाय. यामध्ये झुंड मंदिराला तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तानातील एका पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, हिंदूंनी मंदिराचा विस्तार करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, स्थानिक मौलवींनी मंदिर नष्ट करण्यासाठी एका झुंडीलाच पाचारण केलं. 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वयेच मंदिराचा जीर्णोद्धार
करक जिल्ह्यातील तेरी गावातील ऐतिहासिक मंदिर आणि परमहंसजी महाराज यांच्या समाधीचे 2015 च्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार जीर्णोद्धार आणि विस्तार केला जात होता. या मंदिराला याआधी 1997 मध्ये एका स्थानिक मुफ्तीने नष्ट केलं होतं तसेच त्यावर अवैधरित्या ताबा मिळवला होता.
हा तर नवा पाकिस्तान
अनेक लोकांनी या घटनेला लज्जास्पद ठरवलं आहे. हा नवा पाकिस्तान आहे, असं म्हणत या घटनेची निंदा केली गेलीय तसेच  देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांसोबत कशाप्रकारे व्यवहार केला जात आहे, याबाबत सवाल केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याच्या बातम्या सातत्याने येत राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd demolishes hindu temple in khyber pakhtunkhwa pakistan