पाकिस्तानमध्ये लष्कर-पोलिस आमनेसामने

वृत्तसंस्था
Thursday, 22 October 2020

इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) सदस्य खुर्रम शेर झमान यांनी मरियम व सफदर यांच्याविरुद्ध कराचीतील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

इस्लामाबाद - पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरुद्ध एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या अटकेनंतर सिंध पोलिस आणि लष्कर आमनेसामने आले आहेत. सफदर यांची अटक तसेच सिंध पोलिस प्रमुखांच्या अपहरणाच्या चौकशीचा आदेश लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी दिला आहे.

पोलिसांनी कराचीमधील हॉटेलच्या खोलीत घुसून सफदर यांना ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ पक्षाच्या उपाध्यक्ष मरीयम यांनी केला आहे. आदल्यादिवशी कराचीतील भव्य सभेनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. निमलष्करी दलाने सिंध पोलिस प्रमुख मुश्ताक महर यांचे अपहरण करून त्यांना अटकेच्या आदेशावर सही करण्यास भाग पाडले. सफदर तसेच मरियम यांच्याशिवाय 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यासही भाग पाडण्यात आले. पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जीना यांच्या कबरीपाशी नारेबाजी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) सदस्य खुर्रम शेर झमान यांनी मरियम व सफदर यांच्याविरुद्ध कराचीतील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सूत्रे हालली. जीना यांच्या स्मृतीस्थळापाशी इम्रान यांच्या प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्यामुळे सत्ताधारी नेते संतापले. कबरीच्या आतील बाजूला थांबून सफदर आणि इतर नेते घोषणा देत असल्याच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कबरीच्या आत आणि बाजूच्या परिसरात राजकीय कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे. पोलिस अधिकाऱ्यांमध्ये किमान दोन अतिरिक्त पोलिस संचालक, सात उपनिरीक्षक, सहा वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. यात विशेष शाखा, फोरेन्सिक विभाग, दहशतवादविरोधी विभाग, मुख्यालय, पूर्व व दक्षिण विभाग यांच्या प्रमुखांचा समावेश आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी मागितली साठ दिवसांची रजा
महर यांच्यासह सिंध पोलिस दलाच्या 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी साठ दिवसांची रजा मागितली. महर यांच्या अपहरणामुळे पोलिस दलाच्या मनोधैर्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे कारण देण्यात आले. महर यांनी नंतर सांगितले की, आता चौकशीचा आदेश देण्यात आला असल्यामुळे मी रजेचा अर्ज मागे घेत आहे. सहकाऱ्यांनीही हेच करावे आणि चौकशी अहवाल येण्याची वाट पाहावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boycott of Prime Minister Imran Khan government