esakal | या देशाला सतावतेय कोरोना विषाणूचं नवं केंद्रस्थान बनण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

 brazil,coronavirus

चीनच्या वुहान शहरातील उद्रेकानंतर कोरोना विषाणूचा सर्वात वेगाने संसर्ग युरोपात झाला. युरोपातील इटली, ब्रिटन, स्पेन आणि जर्मनी या देशात हाहाकार उडवून दिल्यानंतर कोरोना विषाणूचा केंद्र अमेरिकेत वळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

या देशाला सतावतेय कोरोना विषाणूचं नवं केंद्रस्थान बनण्याची भीती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ब्रसेलिया : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्वानाच घरात बंदिस्त केले आहे. विषाणूच्या संसर्गाने जगभरातील सर्व देशांनाच वेठीस धरले आहे. चीनच्या वुहान शहरातील उद्रेकानंतर कोरोना विषाणूचा सर्वात वेगाने संसर्ग युरोपात झाला. युरोपातील इटली, ब्रिटन, स्पेन आणि जर्मनी या देशात हाहाकार उडवून दिल्यानंतर कोरोना विषाणूचा केंद्र अमेरिकेत वळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आतापर्यंत संपूर्ण जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळ जवळ 53 लाखांवर पोहचली असून या विषाणूच्या संसर्गाने 3 लाख 38 हजार 232 जणांचा जीव घेतला आहे. मात्र आता कोरोना विषाणूचा आगामी केंद्र ब्राझील हा देश ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.   

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत मेच्या  अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून चीनमधील वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग युरोप आणि अमेरिकेनंतर आता ब्राझील मध्ये मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ब्राझील मध्ये मागील आठवड्यात एकाच दिवसात तब्बल 17 हजार 500 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर सलग चार दिवसात तिसऱ्यांदा हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे . सध्य स्थितीत ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूमुळे बाधित असणाऱ्या रुग्णांची संख्या अमेरिकेच्या  खालोखाल दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 3 लाख 30 हजार 890 इतकी झाली आहे. तर 21 हजार हून अधिक जणांचा या विषाणूमुळे अंत झालेला आहे. दक्षिण अमेरिका हे आगामी कोरोना विषाणूचे केंद्र असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक माईक रायन यांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी ब्राझील देशातील परिस्थिती चिघळत असल्याचे म्हटले आहे.        

कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेळेत घ्या; विरोधी पक्षाची मागणी

यापूर्वी युरोपातील सुरवातीला इटली हे कोरोनाचे केंद्र ठरले होते. इटलीमध्ये 32 हजार 616 नागरिकांनी जीव गमावला असून 2 लाख 28 हजार 658 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे. यानंतर इटलीने घेतलेल्या खबरदारी उपायांमुळे कोरोनाला पूर्णपणे अटकाव करता आले नसले तरी प्रसाराचा वेग मात्र कमी करण्यात यश मिळवले आहे. तर एकट्या अमेरिकेत सर्वात अधिक 16 लाख 1 हजार 434 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत 96 हजार 7  नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना बाधित देश आणि त्या देशातील रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारी खालील प्रमाणे  
1. अमेरिका - 16,01,434 (96,007)    
2. ब्राझील - 3,30,890 (21,048)
3. रशिया - 3,23,448  (3,249)
4. यु के - 2,55,544 (36,475)
5. स्पेन - 2,34,824 (28,628)
6. इटली - 2,28,658 (32,616)
7. फ्रान्स - 1,82,015 (28,218)
8. जर्मनी - 1,79,710 (8,228)
9. टर्की - 1,54,500 (4,276)
10. इराण - 1,31,652 (7,300)
11. भारत - 1,25,149 (3,718)
13. चीन - 84,081 (4,638)

loading image