दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतोय. गेले चार दिवारतर रुग्णसंख्या दररोज किमान हजार रुग्ण आणि काल म्हणजेच शुक्रवारी मुंबईत रुग्णांच्या संख्येत मोठा स्पाईक पाहायला मिळाला. काल एका दिवसात एकट्या मुंबईत १,७५१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. काल  वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनंतर  मुंबईत एकूण २७,२५१ रुग्ण झालेत. मुंबईत शुक्रवारी २७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला, यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ९०९ वर पोहोचलाय.    

मुंबई महापालिकेच्या दाव्यानुसार मुंबईतील कोरोना प्रसाराचा दर मुंबईतील केलेले प्रतिबंधात्मक उपाय, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, रुग्णांना शोधून काढण्याचं प्रमाण त्याचसोबत वाढलेल्या कोरोना चाचण्यांमुळे चाचण्यांमुळे कमी झालाय. अशात मुंबईलतील कोरोना रुग्णांचा आकडा मे महिन्याच्या अखेरीस ४५,००० रुग्ण संख्येपेक्षा कमी असेल असं बृहन्मुंबई महापालिकेने म्हटलंय. 

एप्रिल महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात मे महिन्यात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ही ७०,००० ते ७५,००० च्या घरात जाऊ शकेल असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी त्यावेळी सात दिवसांवर होता. अशात हळूहळू मुंबईतील परिस्थिती सुधारतेय असं चित्र आहे. कारण आता मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा १४ दिवसांवर गेलाय.

एप्रिलनंतर केलेल्या गणितीय सर्वेक्षणात महापालिकेकडून  रुग्णसंख्या दुप्पट होण्याची संख्या दहा दिवसांवर गेल्यावर देखील सर्वेक्षण करण्या आलं होतं. त्यावेळी मुंबईतील रुग्णसंख्या ही ४५,००० पर्यंत जाऊ शकेल अशी आकडेवारी समोर आली होती. आता मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर १२ ते १४ दिवसांवर आहे. अशात मुंबईतील रुग्णसंख्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत ४५,००० च्या आतमध्ये राहण्याचा अंदाज आता व्यक्त करण्यात आलाय.

गेले चार दिवस मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या सात्यत्याने प्रतिदिन १००० ते १५०० एवढी वाढतोय. येते काही दिवस हा आकडा याच वेगाने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

या महिन्या अखेरपर्यंत दररोज मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १,२२० ने वाढली तर मुंबईतील रुग्णसंख्या मे महिन्याच्या अखेरीस ३७,५०० असू शकते. हाच आकडा प्रतिदिन १,५०० ने वाढला तर मुंबईतील रुग्णसंख्या ४०,००० वर जाऊ शकते. मुंबईत आतापर्यंत तब्बल दीड लाख कोरोना टेस्ट केल्या गेल्यात.      

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उप कार्यकारी अधिकारी शाह यांनी याबाबत एका इंग्रजी वेबसाईटला माहिती दिलीये. “आम्ही केवळ चाचण्याच नव्हे तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने मुंबईतील रुग्णसंख्या ४५,००० पेक्षा कमी असू शकते. दरम्यान याआधीचं प्रोजेक्शन हे ७५,००० इतकं होतं. मुंबईत महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करतेय. सध्या रुग्णांना भरती करून घेण्यास काही अडचणी येत आहेत मात्र येत्या काळात ते देखील सुरळीत होण्याचा विश्वास शाह यांनी बोलून दाखवलाय.   

BMC projects mumbais covid 19 patient count says count will be below 45000 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com