esakal | लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रातच बेशुद्ध पडला तरुण; पाहा व्हायरल व्हिडीओमागील सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रातच बेशुद्ध पडला तरुण

लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रातच बेशुद्ध पडला तरुण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूवर (Coronavirus virus) अद्यापही कोणतं ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या विषाणूचा वाढता आळा रोखण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर अनेकांमध्ये त्याची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. किरकोळ ताप येणे, अंग दुखणे अशा काही समस्या नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. परंतु, एका व्यक्तीने लस घेतल्या घेतल्या तो जमिनीवर कोसळला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आला आहे. (brazil-man-maguila-junior-faints-after-getting-corona-vaccine-video-viral-on-social-media)

लस घेतल्यावर अचानक बेशुद्ध पडलेली ही व्यक्ती ब्राझीलची (Brazil) असून त्यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral video) होत आहे. हा व्हिडीओ खुद्द त्याच व्यक्तीने फेसबुकवर (Facebook) शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या तरुणाला इंजक्शन दिल्यानंतर काही काळातच तो जमिनीवर कोसळला. लस घेतल्यानंतर हा तरुण अचानक बेशुद्ध पडल्यामुळे लसीकरण केंद्रावरील सारेच जण घाबरले आणि त्याच्या जवळ घोळका करुन उभे राहिले. मात्र, हा तरुण बराच वेळ जमिनीवर पडून राहतो आणि काही काळाने हळूहळू डोळे उघडतो. त्यानंतर लसीकरण केंद्रातील काही जण या तरुणाला उचलून टेबलावर बसवतात.

हेही वाचा: तहानलेल्या जिल्हाधिकाऱ्याला पाण्याऐवजी पाजलं चक्क अ‍ॅसिड

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात विविध प्रश्नांनी घर केलं. कोरोना लस घेतल्याचा हा दुष्परिणाम आहे का? लस घेणं घातक आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. परंतु, या तरुणाच्या बेशुद्ध पडण्यामागचं कारण काही औरच आहे. लस घेतल्यामुळे हा तरुण बेशुद्ध पडला नसून त्याला इंजक्शनची भीती वाटत असल्यामुळे तो घाबरुन बेशुद्ध पडला.

दरम्यान, या तरुणाला इंजक्शनची भीती वाटत असल्यामुळे लस घेण्यापूर्वीही त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. या व्यक्तीचं नाव मॅगुइला ज्युनिअर असं आहे. मॅगुइला लस घेतांना त्याच्या मित्राने हा व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर मॅगुइलाने स्वत:चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.