फुटबॉलपटू नेमारला कोरोनाची बाधा! कुटुंबासोबतची सहल पडली महागात

वृत्तसंस्था
Thursday, 3 September 2020

ब्राझीलचा प्रसिध्द फुटबॉलपटू नेमारला (Neymar) कोरोनाची बाधा झाली आहे. नेमार हा ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू असून तसेच तो पॅरीस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain F.C) या क्लबकडूनही खेळतो.

कोरोनाची साथ जगभरात पसरत आहे. सध्या अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोनाचा जोर मोठा असून इथं दररोज हजारो नवीन कोरोना रुग्णांचं निदान होत आहे. जगातील राजकारणी आणि प्रसिध्द खेळाडूही यातून सुटले नाहीत. आता ब्राझीलचा प्रसिध्द फुटबॉलपटू नेमारला (Neymar) कोरोनाची बाधा झाली आहे. नेमार हा ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू असून तसेच तो पॅरीस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain F.C) या क्लबकडूनही खेळतो.  नेमारबरोबर त्याच्या संघातील आणखी दोन खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. पण क्लबने आपल्या निवेदनात या खेळाडूंची नावे जाहीर केली नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार, नेमारसोबत अॅंजेल डी मारीया (Ángel Di María) आणि लियांड्रो पॅरेडेस (leandro paredes) यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

सूत्रांनी नेमारच्या नावाची खातरजमा केली आहे-
पीएसजीने निवेदनात म्हटले आहे की 'क्लबचे तिन्ही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेच'. पण नेमके ते तीन जण कोण आहेत याची माहिती दिली नव्हती. सध्या खेळाडूंसाठी देण्यात आलेल्या हेल्थ प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.  आगामी काळात सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचार्‍यांची पुन्हा चाचणी घेतली जाईल.' जेव्हा या तीन खेळाडूंच्या नावावर शंका घेण्यात आली तेव्हा क्लबने याबाबत खुलासा करण्यास नकार दिला आहे. एएफपीच्या मते, सूत्रांनी पुष्टी केली आहे की नेमार हा कोरोना झालेल्या खेळाडूंपैकी एक आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेमार कुटुंबासमवेत  गेला होता सुट्टीवर-
सुत्राच्या माहितीनुसार हे तीन खेळाडू चॅम्पियन्स लीगच्या (UEFA Champions League) अंतिम सामन्यानंतर इबीझा (Ibiza) येथे सहलीसाठी गेले होते. जिथं  त्यांनी सुट्टीची वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवली होती.  यापूर्वी हे तीन खेळाडू 'बायो सिक्युअर बबल'चा (bio secure bubble) भाग होते.  फ्रेंच नियमांनुसार, जर एखाद्या संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तर क्लबचे सर्व प्रशिक्षण सत्रे रद्द केली जातात. तसेच आठ दिवसांसाठी त्यां सर्वांना वेगळे  ठेवण्यात येते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 नेमार हा जगातील सर्वात महागडा खेळाडू आहे
 नेमारने 2016मध्ये फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) सोबत 222 दशलक्ष युरो (सुमारे १66 अब्ज रुपये) साठी पाच वर्षांचा करार केला आहे. यामुळेच नेमार फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये पॉल पोब्गाच्या (Paul Pogba) युवेन्ट्सकडून मँचेस्टर युनायटेडमध्ये येण्यासाठीचा जो विक्रमी करार केला होता, तो नेमारने मोडला होता. या करारासाठी मँचेस्टर युनायटेडकडून पोग्बाला 89 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 7.4 अब्ज रुपये) मिळाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazilian footballer Neymar corona test get positive