esakal | ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'ट्रॅफिक लाइट यंत्रणा'

बोलून बातमी शोधा

britain)

कोरोना संसर्गाच्या धोक्याच्या तीव्रतेनुसार देशांची वर्गवारी करणारी आणि त्यांच्यावर त्यानुसार तात्पुरते प्रवास निर्बंध लागू करणारी ‘ट्रॅफिक लाइट यंत्रणा’ ब्रिटन सरकारने सुरु केली आहे.

ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'ट्रॅफिक लाइट यंत्रणा'
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लंडन- कोरोना संसर्गाच्या धोक्याच्या तीव्रतेनुसार देशांची वर्गवारी करणारी आणि त्यांच्यावर त्यानुसार तात्पुरते प्रवास निर्बंध लागू करणारी ‘ट्रॅफिक लाइट यंत्रणा’ ब्रिटन सरकारने सुरु केली आहे. कोरोना संसर्गामुळे ठप्प झालेली आंतरराष्ट्रीय वाहतूक पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रिटनने ‘अत्यावश्‍यक’ या प्रकारात नसलेल्या सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर निर्बंध घातले होते. आता मात्र संसर्गाच्या धोक्याच्या तीव्रतेनुसार काही देशांना ब्रिटनमध्ये येण्यास परवानगी दिली जाणार आहे. या यंत्रणेनुसार, विविध देशांची विभागणी लाल, केशरी आणि हिरवा अशा रंगांमध्ये केली असून त्यानुसार या देशांमधील प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून त्यांना विलगीकरणाचे कोणते नियम लागू करायचे, हे निश्‍चित करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी मात्र अत्यावश्‍यक असणार आहे. कोणत्या देशाचा कोणत्या रंगामध्ये (वर्गात) प्रवेश केला आहे, त्याची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने रुळावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापार वाढणे आवश्‍यक असून त्याबरोबरच लोकांनाही मुक्तपणे फिरता येणे आवश्‍यक आहे, असे ब्रिटन सरकारने म्हटले आहे.

ब्रिटनच्या महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं निधन

रंग (वर्ग) आणि त्या देशांतील नागरिकांसाठी असलेले नियम
- हिरवा : उड्डाणापूर्वी कोरोनाचाचणी, ब्रिटनमध्ये आल्यावर मात्र कोणतीही चाचणी नाही
- केशरी : उड्डाणापूर्वी कोरोनाचाचणी, ब्रिटनमध्ये आल्यावर १० दिवसांचे विलगीकरण
- लाल : उड्डाणापूर्वी कोरोनाचाचणी, ब्रिटनमध्ये आल्यावर १० दिवस विलगीकरण केंद्रात, शिवाय आल्यावरही चाचण्या.