
Palestine
sakal
लंडन : ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांनी आज (ता. २१) पॅलेस्टाईनला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता दिली. या निर्णयामुळे या तिन्ही देशांनी इस्राईल आणि अमेरिकेविरुद्ध भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने मान्यता दिल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही या निर्णयाला पाठिंबा देऊन ब्रिटनची भूमिका स्पष्ट केली.