ब्रिटनमध्ये मदार त्रिस्तरीय पद्धतीवर; विरोधी पक्षाला हवे लॉकडाउन

dominic rob
dominic rob

लंडन - फ्रान्स, जर्मनी असे युरोपातील शेजारी देश लॉकडाउन लागू करीत असताना ब्रिटनने त्रिस्तरीय पद्धतीवर मदार ठेवली आहे. याद्वारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवता येईल असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी व्यक्त केला.

फ्रान्स, जर्मनीने संसर्गाच्या पहिल्या लाटेसारखेच निर्बंध लागू केले आहेत. स्पेननेही रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ब्रिटनमधील स्थिती त्या तुलनेत आटोक्यात आहे. गेल्या आठवड्यात रोज वीस हजारहून जास्त नवे रुग्ण आणि सरासरी दोनशे मृत्यू अशी आकडेवारी आहे. संसर्गाची साखळी मोडण्यासाठी तात्पुरते लॉकडाउन लागू करावे अशी मागणी विरोधी लेबर पार्टीने केली आहे, पण पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थानिक पातळीवरील निर्बंधांच्या त्रीस्तरीय पद्धतीचा अवलंब केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रीय लॉकडाउन अटळ आहे असे म्हणणे योग्य नाही. सरकारने त्रीस्तरीय पद्धत लागू केल्यापासून संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपाययोजना यशस्वी ठरतील. 
- डॉमिनीक राब, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री

युरोपमध्ये इतर देशात
ऑस्ट्रिया

  • शुक्रवारी नव्या रुग्णांची विक्रमी नोंद
  • गुरुवारचा ४४५३ आकडा हजारपेक्षा जास्त वाढून ५६२७
  • जर्मनीप्रमाणे लाइट लॉकडाउन लागू होण्याची शक्यता
  • प्रसार माध्यमांमध्ये रात्रीच्या संचारबंदीचे वृत्त

नव्या रुग्णांची संख्या सहा हजारच्या आसपास गेली तर परिस्थिती रुग्णालयांच्या क्षमतेबाहेर जाईल. आरोग्य   तज्ञांसह आमची बैठक झाली आहे. शनिवारी आम्ही नवे निर्बंध जाहीर करू.
- सेबॅस्टीयन कुर्झ, ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर

इटली

  • पहिल्या लाटेत ह्रदयद्रावक जिवीतहानी झालेल्या इटलीला दुसऱ्या लाटेचा तडाखा
  • गुरुवारी विक्रमी नवे रुग्ण, आकडा २६८३१
  • कर्जाचे हप्ते फेडण्याबाबत सवलतीच्या योजनेचा कालावधी वाढविणार

राष्ट्रीय लॉकडाउन टाळण्यास सरकारचे निसःशयपणे प्राधान्य आहे. अन्यथा तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सावरण्याच्या भक्कम प्रयत्नांमध्ये अडथळे येतील.
- रॉबर्टो गॉल्तीएरी, इटलीचे अर्थ मंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com