
सध्याचा पगार कमी असल्यामुळे राजीनामा देण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा विचार आहे
लंडन- सध्याचा पगार कमी असल्यामुळे पुढील वर्षी राजीनामा देण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा विचार आहे असे वृत्त डेली मिरर या टॅब्लॉईड दैनिकाने दिले आहे. या वृत्तानुसार जॉन्सन यांचा पगार एक लाख 50 हजार 402 पौंड इतका आहे, जो पूर्वीच्या व्यवसायाच्या तुलनेत कमी असल्याचे आणि त्यामुळे भागत नसल्याचे त्यांना वाटते. एका खासदाराचाही हवाला देण्यात आला आहे. त्यांच्यामते जॉन्सन वृत्तपत्र स्तंभलेखक म्हणून महिन्याला 23 हजार पौंड इतकी कमाई करायचे. ब्रेक्झीटचा विषय मार्गी लागल्यानंतर सहा महिन्यांत त्यांना बाहेर पडायचे आहे. जॉन्सन यांना सहा मुले आहेत, यातील काही मोठी असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याशिवाय घटस्फोटित पत्नी मरीना व्हीलर यांनाही मोठी रक्कम देणे त्यांना भाग पडले होते.