esakal | Amazon चे सीईओ जेफ बेजोस करणार अंतराळ सफर!
sakal

बोलून बातमी शोधा

Jeff Bezos

मे महिन्यातच ब्लू ओरिजिन कंपनीने मोठी घोषणा केली होती. एका फ्लाइटमधून जास्तीत जास्त ६ लोकांना अंतराळात नेण्याची योजना आहे. बेजोस बंधू ३० मिनिटे अंतराळात राहून पृथ्वीवर परतणार आहेत.

Amazon चे सीईओ जेफ बेजोस करणार अंतराळ सफर!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस अंतराळात जाणार आहेत. येत्या २० जुलै रोजी जेफ बेजोस त्यांच्या भावासोबत अंतराळात जाणार आहे, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेफ बेजोस यांची स्वत:ची ब्लू ओरिजिन नावाची स्पेस एजन्सी आहे. ब्लू ओरिजिन कंपनीकडून पाठविण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेस फ्लाइटचा जेफ बेजोस हे एक हिस्सा असणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे अॅमेझॉन कंपनीचे सीईओ पद सोडल्याच्या १५ दिवसानंतर जेफ बेजोस अंतराळात जाणार आहेत. (Amazon founder Jeff Bezos announces he will fly into space next month)

बेजोस यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ''मी पाच वर्षाचा होतो, त्यावेळी अंतराळात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. येत्या २० जुलै रोजी मी माझ्या भावासह हा प्रवास करणार आहे. माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत या साहसी मोहिमेवर अंतराळात जाणार आहे.''

हेही वाचा: टक्कर दोन महासागरांची

दरम्यान, मे महिन्यातच ब्लू ओरिजिन कंपनीने मोठी घोषणा केली होती. एका फ्लाइटमधून जास्तीत जास्त ६ लोकांना अंतराळात नेण्याची योजना आहे. बेजोस बंधू ३० मिनिटे अंतराळात राहून पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळात जाणारे जेफ बेजोस हे पहिले अब्जाधीश ठरणार आहेत. बेजोस यांची घोषणा अनेकांना चकित करून गेली. कारण टेस्लाचे संस्थापक ऐलॉन मस्क गेल्या काही दिवसांपासून अंतराळ आणि मंगळावर जाण्यावरून चर्चेत होते. पण बेजोस यांनी अंतराळात जाण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

हेही वाचा: "पोलिस असल्याचं सांगत आठ-दहा जणांनी मला बेदम मारलं" - मेहुल चोक्सी

जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image