esakal | कोरोनाला हरवून जॉन्सन कार्यालयात हजर; ब्रिटनच्या जनतेला केले 'हे' आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Britains Boris Johnson Recovered From Coronavirus Returns to Work

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात जाऊन सुत्रे पुन्हा हाती घेतली.

कोरोनाला हरवून जॉन्सन कार्यालयात हजर; ब्रिटनच्या जनतेला केले 'हे' आवाहन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात जाऊन सुत्रे पुन्हा हाती घेतली. या घडीला प्रादुर्भावाचा धोका कमाल असताना लॉकडाउनचे पालन करण्याच्या बाबतीत संयम सोडू नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जॉन्सन यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार करण्यात आले होते. तीन आठवड्यांच्या खंडानंतर रविवारी ते कार्यालयात काही वेळ आले. त्यानंतर सोमवारी त्यांनी प्रथमच जाहीर निवेदन केले. ते म्हणाले की, आपण प्रादुर्भावाची लाट परतविण्यास प्रारंभ करीत आहोत. त्यामुळे जनतेचे प्रयत्न आणि त्याग क्षणार्धात वाया जातील असे काही करण्यास माझी तयारी नाही. त्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध इतक्‍यात शिथील केले जाणार नाहीत. रविवारअखेर ब्रिटनमधील मृतांचा आकडा 20 हजार 732 आहे. रविवारी 413 बळींची भर पडली.सोमवारी ब्रिटनमध्ये 329, स्कॉटलंडमध्ये 13 आणि वेल्समध्ये आठ असे बळी गेले.

ना मृत्यू, ना कोमा; या कारणाने किम जोंग उन अंडरग्राउंड

उद्योगपतींच्या मनातील चिंता आपण समजू शकतो असे नमूद करून ते म्हणाले की, लॉकडाउन उठावे म्हणून हा वर्ग आधीर झाला आहे, पण लॉकडाउन उठविले तर प्रादुर्भावाचा दुसरा टप्पा सुरु होईल. त्यात जास्त बळी जातील. आर्थिक संकटही तीव्र होईल. त्यामुळे तुम्ही उतावीळपणावर नियंत्रण ठेवावे असे मी सांगतो. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, पुढील वाटचाल करण्याची देशाची क्षमता कशी आहे याचा आढावा सरकार कसा घेणार याचा तपशील आठवडाअखेर जाहीर करण्यात येईल.

आरबीआययकडून कर्जबुडव्यांची कर्जमाफी; माफीत मेहुल चोक्सीचाही समावेश

आपल्याला कार्यालयापासून अपेक्षेपेक्षा जास्त काळ दूर राहावे लागले. याबद्दल मी दिलगीर आहे. मला पाठिंबा दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे. जनतेनेही माझ्यासाठी विलक्षण जिद्द आणि निष्ठा प्रदर्शित केली. - बोरीस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान

loading image
go to top