आरबीआययकडून कर्जबुडव्यांची कर्जमाफी; माफीत मेहुल चोक्सीचाही समावेश

वृत्तसंस्था
Tuesday, 28 April 2020

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० बड्या कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटींची कर्ज माफ केल्याची बाब उघड झाली आहे. आरबीआईने याबाबत कबुलीही दिली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० बड्या कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटींची कर्ज माफ केल्याची बाब उघड झाली आहे. आरबीआईने याबाबत कबुलीही दिली आहे. कर्ज माफ करण्यात आलेल्या कार्जबुडव्यांमध्ये पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीचाही समावेश असल्याचे आरबीआयने महिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत हे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साकेत गोखले यांनी १६ फेब्रुवारीपर्यंत ५० बड्या कर्जबुडव्यांची माहिती आणि त्यांनी घेतलेल्या कार्जाची काय स्थिती आहे यासंदर्भात माहिती मागवली होती. त्याला माहिती अधिकाराअंतर्गत उत्तर मिळाले असून त्यांनी कबुलीही दिली आहे. केंद्र सरकारने माहिती देण्यास नकार दिला असला तरी आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी साकेत यांच्या अर्जाला उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये कर्जबुडव्यांबद्दलच धक्कादायक माहिती समोर आल्याचे साकेत यांनी म्हटलं आहे.

कृषि मालाची गोदामी लुटली; मग पोलिसांनी...

६८ हजार ६०७ कोटी रुपये थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या/हेतूपूर्वक राइट ऑफ रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत. देशातील शिखर बँक असणाऱ्या आरबीआयने कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे. यासाठी बँकेने सर्वोच्च न्यायलयाने १६ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या एका निकालाचा संदर्भ दिला आहे, असं साकेत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.

दीर्घ लढाईची तयारी ठेवा : नरेंद्र मोदी

सर्वाधिक कर्जमाफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये चोक्सीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोक्सीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोक्सीचा भाचा आणि १३ हजार कोटींच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks technically write off over Rs 68000 cr loans Choksi among 50 top wilful defaulters