शाही परिवारापासून दूर होणे दुःखदायक - राजपुत्र हॅरी

पीटीआय
मंगळवार, 21 जानेवारी 2020

राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल हे शाही परिवाराच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. ‘शाही परिवारापासून दूर होणे, हे अत्यंत दुःखदायक आहे; पण त्याबरोबरच मला आणि पत्नी मेगन यांना हा निर्णय घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता,’ असे हॅरी म्हणाले.

लंडन - राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल हे शाही परिवाराच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. ‘शाही परिवारापासून दूर होणे, हे अत्यंत दुःखदायक आहे; पण त्याबरोबरच मला आणि पत्नी मेगन यांना हा निर्णय घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता,’ असे हॅरी म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनमधील राजघराण्याच्या कर्तव्यापासून मुक्त होण्यास हॅरी आणि मेगन यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी परवानगी दिल्यानंतर शनिवारी (ता. १८) यासंबंधीच्या करारावर त्यांनी सह्या केल्या. त्यानंतर त्यांनी प्रथमच त्यांच्या भावना सार्वजनिकरीत्या व्यक्त केल्या.

चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चा तिसरा बळी

‘मी आणि मेगनने जेव्हा विवाह केला, त्या वेळी शाही घराण्याची कर्तव्य बजावण्यास उत्सुक आणि आशादायी होतो. त्यामुळे आता या टप्प्यावर येणे हे माझ्यासाठी खूप दुःखाची बाब आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Briton Prince Harry Talking

टॅग्स