video : केव्हीन लीच्या 'त्या' किकने चुकविला सर्वांच्या काळजाचा ठाेका

वृत्तसंस्था
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

न्यूयाॅर्क येथील UFC 244 च्या रंगतदार लढतीत केव्हीन ली याने जाॅर्जर गिलेस्पी याचा नाॅकआऊटमध्ये हेडकिक मारत पराभव केला. याच फाईटची सध्या जाेरदार चर्चा आहे.

न्यूयाॅर्क : सध्या न्यूयाॅर्क येथे UFC 244 च्या रंगतदार लढती सुरु आहेत. या लढतींमध्ये माेठा थरार पाहायला मिळत आहे. यामध्ये केव्हीन ली आणि जाॅर्जर गिलेस्पी यांच्यातील लढत खुपच थरारक झाली. यामध्ये केव्हीन ली याने जाॅर्जर गिलेस्पी याचा नाॅकआऊटमध्ये हेडकिक मारत पराभव केला. याची सध्या या फाईटची जाेरदार चर्चा आहे.

या लढती अगाेदर नावाजलेला व प्रसिद्ध रेसलर असलेला गिलेस्पी हा सलग 13 लढती जिंकला हाेता. ताे एकही लढत हरलेला नव्हता. तसेच ली हा या लढती अगाेदरच्या दाेन लढती हरलेला हाेता. त्यामुळे या आज झालेल्या लढतीत जाॅर्जर गिलेस्पी याचे पारडे जड हाेेते. लढत सुरु झाल्यानंतर देखील तसेच चित्र हाेते. 

दरम्यान, या लढतीत गिलेस्पी याने मारलेल्या एका किकमुळे ली याचा उजवा हात जायबंदी झाला. मात्र तरीदेखील ताे गिलेस्पीला जाेरदार टक्कर देत हाेता. मात्र पुढच्या काही क्षणात ली गुलेस्पी याच्यावर हावी झाला व त्याने जबरदस्त हेडकिक मारत लढत जिंकली. या हेडकिकनंतर काही काळ गिलेस्पी याला काहीही दिसेनासे झाले हाेते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brutal knockout kevin lee destroys gregor gillespie at ufc 244