
पाकिस्तानमध्ये एक इमारत कोसळल्यानंतर एक चमत्कार समोर आला आहे. कराचीच्या लियारी भागात पाच मजली इमारत कोसळली. ही दुर्घटना इतकी मोठी होती की सुमारे ५३ तासांत बचावकार्य पूर्ण करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, एकूण २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यापैकी २० जण एकाच कुटुंबातील होते. तर 3 महिन्यांची चिमुकली सुखरुपरित्या बचावली आहे.