

Bulgaria Highway Pile-Up: 12 Dead in Fog Crash
esakal
युरोपमधील बल्गेरियामध्ये मंगळवारी (११ नोव्हेंबर) दाट धुक्यामुळे भीषण साखळी अपघात घडला. पूर्व बल्गेरियातील एका महामार्गावर कमी दृश्यमानतेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, ५० हून अधिक वाहने या दुर्घटनेत सामील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा