बुर्ज खलिफा: जगातील सर्वात उंच इमारतीचा एक तृतीयांश भाग रिकामा आहे?

Burj Khalifa: दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात उंच इमारत आहे.
Burj Khalifa
Burj Khalifa Sakal

दुबई (Dubai) हे संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींपैकी एक आहे. जगातील सर्वात उंच इमारत (World's tallest building) बुर्ज खलिफा (Burj Khalifa) याच शहरात आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का बुर्ज खलिफाचा २०० मीटरचा भाग अजूनही रिकामा आहे. या परिसरात कोणालाही राहण्याची परवानगी नाही. या गगनचुंबी इमारतीच्या फक्त ७१ टक्के भागात लोक राहतात. दुबईत बुर्ज खलिफाची उभारणी 2010 मध्ये पूर्ण झाली. मग या इमारतीत घर आणि ऑफिससाठी जागा घेण्यासाठी जगभरातील श्रीमंतांमध्ये स्पर्धा लागली. समुद्राच्या काठावर वसलेली ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. (Unknown Fact about Burj Khalifa, Dubai)

Burj Khalifa
बुर्ज खलिफा बनली जगातील सर्वांत उंच दानपेटी; कशी ते वाचा सविस्तर

बुर्ज खलिफामध्ये हजारो लोक राहतात. बुर्ज खलिफामध्ये आलिशान घरे, अत्याधुनिक मनोरंजन स्थळे आणि अगदी जलतरण तलावही आहेत. पण त्याच्या रचनेमुळे या विशाल गगनचुंबी इमारतीचा मोठा भाग पूर्णपणे निर्जन आहे. बुर्ज खलिफामध्ये 200 पेक्षा जास्त मजले आहेत, परंतु यापैकी फक्त 160 मजले लोकांसाठी योग्य आहेत. या इमारतीचा 200 मीटरचा भाग इतका पातळ आहे की तो कोणीही राहण्यासाठी जाऊ शकत नाही.

रमजान दरम्यान बुर्ज खलिफासाठी वेगवेगळे नियम-

ही इमारत इतकी उंच आहे की, त्यात राहणाऱ्या लोकांना रमजानच्या काळात वेगळा नियम पाळावा लागतो. बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर असलेल्यांना रमजानमध्ये जमिनीवर असलेल्यांपेक्षा दोन मिनिटांनी उपवास सोडण्याची सूचना दिली जाते. कारण बुर्ज खलिफामध्ये उंचावर राहणारे लोक दोन मिनिटे जास्त सुर्य पाहू शकतात.

Burj Khalifa
"हम यहाँ सिर्फ बुर्ज खलिफा देखने आये है"; जाफरने केलं पीटरसनला ट्रोल

बुर्ज खलिफाचा एक तृतीयांश हिस्सा रिकामा असूनही एक वेगळी समस्या आहे. या इमारतीचे सांडपाणी दुबईतील वेस्टवॉटर सिस्टीमशी जोडलेली नाही. त्यामुळे दररोज काही ट्रक ते घेऊन जातात. साधारणपण 35000 लोकांचं निवासस्थान असलेल्या या इमारतीमधून साधारणपणे 15 टन सीवेज होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com